मुंबई : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत, अशा कडक सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी रविवारी (दि.8) महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या ज्या चुकांमुळे अपयश आले, त्या टाळण्याच्या सूचना शहा यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. शहा यांच्या अध्यतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. त्यावेळी शाहंनी वरील सूचना केल्या आहेत. (Amit Shah On Maharashtra Vidhan Sabha Election)
अजितदादा आमचे कॅप्टन, मध्येच शस्त्र टाकू शकत नाही; बड्या नेत्यानं भरला विश्वास
महायुतीतील नेत्यांनी संयम ठेवावा
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत शाहंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी असे शाहंनी सांगितले आहे.
Video: बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल तर आम्ही काय?..राऊतांचा अमित शहांवर वार
जिंकून येणारे उमेदवार निश्चत करा
शाहंनी मार्गदर्शन करताना काही निकषांच्या आधारे जागावाटप करण्याच्या आणि जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करण्याच्या सूचनाही शाह यांनी दिल्या आहेत. मराठवाड्यासह काही भागात मराठा आरक्षणाचा भाजपला मोठा फटका बसला. संविधान बदलाची चर्चा, कांदा निर्यातबंदीसह काही बाबींमुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत या बाबींकडे काटेकोरपणे लक्ष देण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे.
अमित शाहंच्या दौऱ्यात दादांची अनुपस्थिती
ऐन विधानसभांच्या तोंडावर महायुतीत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला असून, या सर्व घडामोडींमध्येच शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहे. असे असतानादेखील काल सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असतानाहीदेखील एकट्या एकनाथ शिंदेंनीच शाहंची भेट घेतल्याचे पाहण्यास मिळाले. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप शाहंची भेट घेतली नाही. त्यामुळे अजित पवार महायुतीत नाराज आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
‘शरद पवारांच्या मनात काय आहे हे त्यांच्या बायकोला माहिती नसते तर …, आव्हाडांचा फडणवीसांना खोचक टोला
अजितदादा शाहंची विमानतळावर घेणार भेट?
एकीकडे अजित पवार हे मुंबईत असूनदेखील त्यांनी अमित शाहंची भेट न घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले असून, अजित पवार अमित शाहंना मुंबई विमानतळावर भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. शाह आणि महायुतीच्या नेत्यामध्ये विमानतळावर बैठक पार पडणार आहे. या बैठकीस राष्ट्रवादीकडून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.