Amit Shah Tweet On Kharhghar Heat Stork Accident : काल प्रसिध्द निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरवण्यात आलं. देशाचे केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील लाखो नागरिकांना उपस्थिती लावली होती. कडक-रणरणतं ऊन असूनही राज्यातील अनेक लोक या पुरस्कार सोहळ्यासाठी हजर होते. दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांपैकी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. ज्यात आतापर्यंत 12 श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी ट्वीट केले आहे.
“Amit Shah यांच्या वेळेमुळेच दुपारी कार्यक्रम; व्हीआयपी छपराखाली आणि…” संजय राऊत यांचा हल्लाबोल
अमित शाहांचं ट्वीट काय?
काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो असे शाह यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे.
मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.— Amit Shah (@AmitShah) April 17, 2023
12 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जण एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावरुन राज्य सरकारवर सर्वस्तरातून टीका करण्यात येते आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. सरकारने ८ क्विक रिस्पॉन्स टीम, वनविभागाचे कर्मचारी, सर्पमित्रांची एक मोठी टीम, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या, सिडकोकडून पाण्याची सेप्रेट नवीन लाईन, १३ वेगवेगळ्या कंपनीचे टॉवर जर इतकी व्यवस्था सरकारने केली होती तर याचाच अर्थ उष्माघाताचा त्रास श्रीसेवकांना होवू शकतो हे त्यांना माहीतच होते. इतके सगळे नियोजन केलेच होते तर मग वेळेचे नियोजन सरकारला का करता आले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडीच्या सभेला युतीचे सभेने उत्तर? महाराष्ट्र दिनी मुंबईत सत्ताधारी पक्षाकडूनही सभा
सांस्कृतिक विभाग दोषी
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेला महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग दोषी आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. नवी मुंबईतील जाऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केल्यानंतर माध्यमांशी बोलताना दानवेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केला होता. मी स्पष्ट बोलतो सांस्कृतिक विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण याची जबाबदारी सरकारची होती. या घटनेमुळे सरकारचं नाव खराब झालं आहे. या विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असेही दानवे म्हणाले.