महाविकास आघाडीच्या सभेला युतीचे सभेने उत्तर? महाराष्ट्र दिनी मुंबईत सत्ताधारी पक्षाकडूनही सभा

  • Written By: Published:
महाविकास आघाडीच्या सभेला युतीचे सभेने उत्तर? महाराष्ट्र दिनी मुंबईत सत्ताधारी पक्षाकडूनही सभा

महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर काल नागपूरमध्येही महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केलेल्या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सर्व नेते उपस्थित होते. 1 मेला महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची तिसरी सभा मुंबईत सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात पार पडला होता. याच मैदानात महाविकास आघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे.

ठाकरे-पवारांसमोरच जयंत पाटलांचे सूचक विधान! म्हणाले… कुछ तो मजबुरीया…!

पण महाविकास आघाडीच्या या सभेचं टायमिंग साधून त्याच दिवशी मुंबईमध्ये सत्ताधारी शिवसेना – भाजप कडून देखील मुंबईमध्ये जाहीर कार्यक्रम घेतला जाणार आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुंबईमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना भाजपच्या वतीने आयोजित या कर्यक्रमामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. एकाच दिवशी मुंबईमध्ये दोन्ही गटाकडून आयोजित या कार्यक्रमामुळे मुंबईतील  वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार तयारी केली जाईल आणि सभा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Maharashtra Bhushan Award ceremony : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, संभाजी ब्रिगेड आक्रमक

राज्यभरात महाविकास आघाडीकडून एकूण 16 सभा घेतल्या जाणार आहेत. पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता काल नागपूर आणि महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. त्याशिवाय येत्या काळात नाशिक, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube