ठाकरे-पवारांसमोरच जयंत पाटलांचे सूचक विधान! म्हणाले… कुछ तो मजबुरीया…!

ठाकरे-पवारांसमोरच जयंत पाटलांचे सूचक विधान! म्हणाले… कुछ तो मजबुरीया…!

Jayant Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ४० आमदार यांच्याबाबत उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी अजित पवार यांच्यासमोरच सूचक विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जयंत पाटील म्हणाले की, उद्धवजी आपल्याला एक सांगायचं आहे, कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी, युहीं कोई बेवफा नहीं होता. म्हणजे तुम्हाला जे ४० आमदार सोडून गेले आहेत त्यांची काहीतरी अडचण असेल. कुठेतरी नस दाबली असेल, तुम्ही समजून घ्या, असं विधान केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्याविषयी माध्यमात येत असलेल्या बातम्यांमुळे जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावरील दबावाबाबत तर सूचक विधान केले नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस यांचे सरकार कोसळू शकते. जर हे सरकार कोसळले तर भाजप हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासह काही आमदारांवर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दबाव टाकत असल्याची जोरदार चर्चा आहे.

Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस सरकार उलट्या पायाचे… – Letsupp

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांना तुमचे ४० आमदार सोडून गेले. त्यांची काहीतरी मजबुरी असेल तुम्ही समजून घ्या, असे वक्तव्य केले. मात्र, जयंत पाटील यांनी हे विधान अजित पवार यांच्या बाबत तर नाही ना केले, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांवर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भाजप ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणत असल्याची चर्चा आहे. पण आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून भाजपसोबत जाणार नाहीत, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याच संजय राऊत यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube