Download App

“साहेब म्हणतील ते धोरण!” अमोल कोल्हे पुन्हा शरद पवारांच्या गोटात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी अजितदादांचा हात धरत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला. यात शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील आघाडीवर होते. ते अजित पवार यांच्या शपथविधीला देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी काहीही न बोलण्याची भूमिका घेतली होती. मात्र, कालच्या बंडखोरीनंतर आता त्यांनी घुमजाव करत ‘मी साहेबांसोबत’ म्हणत शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले.

एक व्हिडीओ ट्विट करत कोल्हेंनी म्हटले की,  जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। अशा आशयाच्या ओळी टाकत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मी साहेबांसोबत हा हॅशटॅग देखील वापरला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण. बापाला कधी विसरायचं नसतं. असंही ते म्हणाले.

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील अनेक समीकरण बदलली आहे. राष्ट्रवादीचे 53 पैकी 32 आमदार सध्या अजित पवार यांच्यासमवेत आहेत. तर 12 आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. या आमदारांशिवाय 8 आमदार कुंपणावर आहेत. हे आमदार अद्यापही संभ्रमात असून नेमकी कोणाची साथ द्यायची या विचारात आहेत. याशिवाय काल सुनील तटकरे, अमोल कोल्हे आणि प्रफल्ल पटेल हे खासदारही अजित पवार यांंच्यासोबत होते.

अजित पवारांसोबत असलेले आमदार :

1. छगन भुजबळ
2. दिलीप वळसे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. धनंजय मुंडे
5. आदिती तटकरे
6. संजय बनसोडे
7. अनिल पाटील
8. धर्मरावबाबा आत्राम
9. किरण लहमाटे
10. निलेश लंके
11. दौलत दरोडा
12. बाबासाहेब पाटील
13. अतुल बेनके
14. सुनिल टिंगरे
15. इंद्रनील नाईक
16. अशोक पवार
17. अण्णा बनसोडे
18. सरोज अहिरे
29. बबनदादा शिंदे
20. यशवंत माने
21. नरहरी झिरवळ
22. दत्ता भरणे
23. शेखर निकम
24. दीपक चव्हाण
25. राजेंद्र कारेमोरे
26. नितीन पवार
27. मनोहर चंद्रिकापुरे
28. संग्राम जगताप
29. राजेश पाटील
30. सुनील शेळके
31. दिलीप मोहिते

अजित पवारांसोबत असलेले विधानपरिषदेचे आमदार कोणते ?

1. रामराजे निंबाळकर
2. अमोल मिटकरी
3. शशिकांत शिंदे
4. अनिकेत तटकरे
5. विक्रम काळे
6. सतीश चव्हाण

अजित पवारांसोबत खासदार कोणते ?

1. सुनिल तटकरे
2. प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)

शरद पवारांसोबत असलेले आमदार :

1. जयंत पाटील
2. जितेंद्र आव्हाड
3. रोहित पवार
4. राजेश टोपे
5. प्राजक्त तनपुरे
6. अनिल देशमुख
7. सुनिल भुसारा
8. सुमनताई पाटील
09.संदीप क्षीरसागर
10. बाळासाहेब पाटील
11. चेतन तुपे
12. मानसिंगराव नाईक
13. मकरंद पाटील

शरद पवारांसोबत खासदार कोणते ?

1. सुप्रिया सुळे
2. श्रीनिवास पाटील
3. अमोल कोल्हे
4. वंदना चव्हाण (राज्यसभा)
5. फौजिया खान (राज्यसभा)

विधानपरिषद आमदार कोणते ?

1. अरुण अण्णा लाड
2. एकनाथ खडसे
3. बाबाजानी दुर्राणी

यांची भूमिका अद्याप अस्पष्ट –

1. नवाब मलिक
2. प्रकाश सोळंखे
3. बाळासाहेब आजबे
4. आशुतोष काळे
5. दिलीप बनकर
6. माणिकराव कोकाटे
7. चंद्रकांत नवघरे
8. राजेंद्र शिंगणे (कुटुंबियांसह सहलीला गेले आहेत)

Tags

follow us