Satara Crime : सातारा शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूरमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली आहे. (Crime) हल्ला करणाऱ्या आरोपीचा शिक्रापूर येथे सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. लखन भोसले असे एन्काऊंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. जबरी चोरी प्रकरणात लखन भोसलेला अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर त्याने हल्ला केला होता. हल्ल्यात सातारा पोलीस दलातील चार पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे पोलिसांनी एन्काऊंटर केलेला आरोपी लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी आहे. लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करुन फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले असताना ही घटना घडली आहे.
सोनसाखळी चोरीतील आरोपीला पकडण्यासाठी सातारा पोलिसांचे एक पथक पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात आले होते. तीन आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. आरोपींना पकडण्यासाठी गेले असताना लखन जाधव याने पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले.
लखन जाधवने चाकू हल्ला केल्यानंतर सातारा पोलिसांनी स्वसंरक्षणात बंदुकीतून गोळी झाडली. गोळी लखन भोसलेच्या कमरेत लागली. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु झाले. उपचारादरम्यान लखन भोसलेचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चकमकीदरम्यान इतर आरोपी पसार झाले.