राज ठाकरेंनी मशिदीमध्ये जाऊन हनुमान चालिसाचं पठण करुन दाखवावं; आनंद दवेंचं आव्हान

Anand Dave On Raj Thackeray : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये (Trimbakeshwar Temple) अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. या मंदिराच्या मुद्द्यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, मला असं वाटतं की, परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. हा विषय संस्थानाचा आणि गावकऱ्यांचा […]

Raj Thackeray Anand Dave

Raj Thackeray Anand Dave

Anand Dave On Raj Thackeray : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये (Trimbakeshwar Temple) अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. या मंदिराच्या मुद्द्यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, मला असं वाटतं की, परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. हा विषय संस्थानाचा आणि गावकऱ्यांचा विषय आहे, असंही ते म्हणाले. याचं मुद्द्यावर बोट ठेवत हिंदू महासंघाचे (Hindu Mahasangha)अध्यक्ष आनंद दवे यांनी राज ठाकरेंवर परखड टीका केली आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर (Karnataka Elections) राज ठाकरेंनी कट्टर हिंदुत्वाची भूमिका सोडताहेत की काय? अशी भीती मनात आल्याचं त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी राज ठाकरेंनी मशिदीमध्ये जाऊन हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa)पठण करुन दाखवावं असाही खोचक टोला यावेळी आनंद दवेंनी लगावला आहे.

Siddaramaiah On PM Modi: मोदींच्या शुभेच्छांना सिद्धरमय्यांचे उत्तर; शपथविधी दिवशीच काँग्रेस-भाजप संर्घषाला सुरूवात

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, राज ठाकरेंनी सांगितले की, ती परंपरा आहे. त्यावरुन दवेंनी ठाकरेंना सवाल केला की, त्यांनी ही परंपरा असल्याचं सिद्ध करुन दाखवावं. त्या दिवशी आमच्याबरोबर स्थानिक नागरिक होते, मंडळाचे विश्वस्त होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, अशी कधीही परंपरा नव्हती, असा कुठेही उल्लेख नाही. मागच्या एकदोन वर्षांमध्ये प्रयत्न केला. यावर्षी त्याला जास्त विरोध केला, त्यामुळे त्याच्या बातम्या झाल्या. अशी कुठेही, कधीही परंपरा नव्हती, जर राज ठाकरेंकडे असेल तर त्यांनी परत आणावी आम्ही त्याचं स्वागत करु असंही यावेळी आनंद दवे म्हणाले.

दुसरी गोष्ट राज ठाकरेंनी सांगितली की, हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का की, मुस्लिमांच्या येण्याने कमकुवत होईल. त्यावर दवे म्हणाले की, निश्चितच नाही. परंतु मुस्लिमांच्या आत येण्यामुळेच मंदिरांचे दर्गे तयार झाले आहेत. मुस्लिमांच्या भारतात येण्यामुळेच देशाच्या फाळण्या झाल्या आहेत, हे सुद्धा पाहायला पाहिजे. जर दोन्ही धर्म वेगळे, दोन्हींची पूजा पद्धती वेगळी, प्रार्थनास्थळं वेगळी असताना आम्ही तुमच्या मंदिरात किंवा प्रार्थनास्थळामध्ये येऊन असा काही उपद्व्याप का करायचा याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. माझी राज ठाकरेंना विनंती आहे की, त्यांनी एखाद्या मशिदीमध्ये जाऊन हनुमान चालिसा किंवा गणपती अथर्वशीर्षचे पाठ करावे, तर आम्ही त्यांचं नेतृत्व मान्य करु असंही ते म्हणाले.

तीसरं असं सांगितलं की, स्थानिकांनी जायला पाहिजे होतं बाकीच्यांची गरज नव्हती असं ते म्हणाले. त्यावर दवे म्हणाले की, राजसाहेब हा त्र्यंबकेश्वरमधल्या दोन भावांमधला किंवा शेजारच्यांचा शेतीचा वाद नव्हता की, स्थानिकांनी मिटवावा हा हिंदू धर्मावरचा आघात होता. आणि हिंदू धर्माची स्थानं ही भारतातल्याच नाही तर जगातल्या लोकांसाठी अस्मितेचा प्रश्न असतो. त्यांनी या ठिकाणी यायलाच पाहिजे होतं, माझं तर मत आहे की, यावेळी स्थानिक लोकांनी ते अडवलं, पुढच्या वेळी जर असं काही झालं तर स्थानिकांनी बाहेर पडूच नये, आम्ही बाहेरची लोकं त्याचं नेतृत्व करु आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, मात्र बाहेरचा आतला असा काही प्रकार नसतो. हिंदू तितुका मेळवावा असं जर असेल तर हिंदू धर्माच्या आघातासाठी संपूर्ण भारतातून सर्व हिंदूंनी येणं आवश्यक आहे, असंही यावेळी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले.

Exit mobile version