Download App

गणेश विसर्जन 2025 : आनंद, भक्ती आणि भावनांच्या लाटेत लाडक्या बाप्पाला आज निरोप

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज राज्यभरात गणेश विसर्जन. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर...

  • Written By: Last Updated:

Ganesh Immersion Celebaration In Mumbai Pune : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात केली आहे. घरगुती गणपतींपासून ते मोठ्या मंडळांच्या मिरवणुकांपर्यंत सर्वत्र भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडत आहे.

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुका

– पुण्यातील पाच मानाचे ( Anant Chaturdashi) गणपती आज पारंपरिक शिस्त आणि भव्य सजावटीसह विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत.
– कसबा गणपती, मानाचा पहिला गणपती, लवकरच मिरवणुकीला सुरुवात करणार (Ganeshotsav 2025) आहे.
– तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा दुसरा गणपती (Ganesh Immersion), ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक दिंडी स्वरूपात निघणार असून महिलांच्या ओव्या आणि नऊवारी परिधान केलेल्या मंडळींचं पथक यावर्षीचं खास आकर्षण ठरणार आहे.
– गुरुजी तालीम गणपती, मानाचा तिसरा गणपती, यंदा काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा घेऊन रथ सजवण्यात आला आहे. आकर्षक फुलांची आरास, झांज-लेझीम पथकं आणि शिस्तबद्ध मिरवणुकीतून सांस्कृतिक वारसा झळकणार आहे.
– दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा अजित पवारांकडून

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनाआधी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक पूजाअर्चा केली. मंदिरात आरतीदरम्यान सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतलं.

मुंबईत लालबागच्या राजाची मिरवणूक ठरवणार आकर्षण

मुंबईत परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. भाविकांच्या गर्दीत उत्साहाचा माहोल आहे. यानंतर सर्वांचे लक्ष लालबागच्या राजाच्या मिरवणुकीकडे लागलं आहे. सकाळी साडेदहा वाजता उत्तर पूजा आणि आरतीनंतर लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक निघणार असून स्वरांजली बँड पथकाद्वारे बाप्पाला मानवंदना दिली जाणार आहे. तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होऊन परंपरेला रंगत आणत आहे.

राज्यभरातून बाप्पाला निरोप

अनंत चतुर्दशी निमित्त राज्यभर गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असून भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला जात आहे. ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम, झांज पथकं, महिलांच्या पारंपरिक वेशभूषेतल्या दिंड्या आणि सजवलेले रथ हे सर्वत्र आकर्षण ठरत आहेत. लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देताना भक्तांच्या डोळ्यांतून अश्रू आणि चेहऱ्यावर अपार आनंद दिसतोय.

 

follow us