मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना हवाहवासा असणारा नेता आखेर भाजपमध्ये आला आहे. महाराष्ट्राचे माजी अर्थ राज्यमंत्री अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यांच्याबरोबर मुलगा नकुल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी पक्षात प्रवेश केला आहे. अनंतराव देशमुख यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर देखील काम केले आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून काँग्रेस पक्षात ते सक्रिय नाही.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून काम केले आहे. तसेच राहुल गांधी आणि राजीव सातव यांच्याबरोबरही त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. तर वाशिम जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसच्या खात्यात जमा करण्याचे श्रेय अनंतराव देशमुख यांना मिळाले आहे.
Old Pension Scheme : चर्चा फिस्कटली… पुन्हा नवी समिती स्थापन करणार!
अनंतराव देशमुख यांनी सन १९८९ ते १९९६ वाशिम-अकोला लोकसभा मतदार संघांचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अमित झनक यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला आहे. तर २००९ मध्ये त्यांनी अमित झनक यांच्या वडिलांच्या विरोधातही निवडणूक लढवली होती. पण तेव्हाही ते थोडक्या मतांनी हरले होते.
विदर्भातील वाशिम-अकोला जिल्ह्यासाठी अनंतराव देशमुख हे परिचयाचे आहे. वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंग्रह असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. देशमुख हे आधी आमदार होते. त्यांनी राज्याचे अर्थ राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यानंतर ते खासदार झाले.