Angry Indrajit Bhalerao leaves stage due to Confusion time planning at Sahitya Samelan : सध्या दिल्लीमध्ये 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचा उद्घाटन झाले त्यानंतर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वेळेचा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे कवी इंद्रजीत भालेराव यांनी नाराज होत व्यासपीठ सोडलं.
दिल्लीतील अभामसा संमेलनानंतर छ. संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन, पाहा फोटो…
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वेळेचा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. संमेलनामध्ये वेळेचे नियोजन विस्कळीत झाले. त्यामुळे कवी संमेलनाचा कार्यक्रम लांबला आणि कवी इंद्रजीत भालेराव यांनी नाराजी व्यक्त करत व्यासपीठ सोडलं.
कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द! बसवरील हल्ल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sammelan) उद्घाटन दिल्लीमध्ये पार पडले. यावेळी देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वातांना माझा नमस्कार,असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरूवात केली. दिल्लीमध्ये (Delhi) या साहित्य संमेलनाचं आयोजन होतंय. एक भाषा किंवा एका राज्यापुरतं हे आयोजन नाहीये.
छावातील ‘त्या’ सीन्सवर कान्होजी-गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप; दिग्दर्शक उतेकरांनी मागितली माफी
मराठी साहित्य संमेलनात आझादीच्या लढाईची महक, सांस्कृतीची विरासत आहे. ज्ञानबा-तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्लीतून अतिशय मनापासून अभिवादन करते, असं मोदी म्हणालेत. अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पहिल्या आयोजनापासून आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रवासाचे साक्षीदार आहेत. आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिवस अतिशय चांगला निवडला असं मोदी (PM Modi News) म्हणालेत.