कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द! बसवरील हल्ल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द! बसवरील हल्ल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Karnataka Buses cancelled Pratap Sarnaik’s instructions after attack on bus : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कायमच धगधगता राहिला आहे. मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. परंतु, कर्नाटक सरकारकडून त्याला दाद दिली जात आहे. उलट मराठी भाषिकांना त्रास देण्याचेच उद्योग कर्नाटक सरकार आणि कन्नडिगांकडून केले जातात. असाच प्रकार शुक्रवारी 21 फेब्रुवारी 2025 ला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले.

छावातील ‘त्या’ सीन्सवर कान्होजी-गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप; दिग्दर्शक उतेकरांनी मागितली माफी

ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो. तथापि, प्रवासी व आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांना दिले आहेत.

रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत ‘उदय’ होणार ? थेट मंत्र्यांनीच मुलाचा वाढदिवस साजरा केलाय

दरम्यान परिवहन मंत्री सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. तसेच ” या प्रकरणात तुम्ही एकटे नसून, आपले सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे.” अशी ग्वाही देखील दिली. तसेच कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाची चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील. असे निर्देश देखील त्यांनी एसटी महामंडळाला यावेळी दिले.

मुलं वडिलांचे जुने फोटो पाहून रडतात, शाळेत जात नाहीत; महादेव मुंडेंच्या पत्नीने धसांसमोर मांडली व्यथा

शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास वाजता मुंबई आगाराची बस बंगळुरू -मुंबई येत असताना (बस क्रमांकMH14 K Q 7714) ही बस चित्रदुर्गच्या पाठीमागे दोन किलोमीटर आली असता तथाकथित कर्नाटक संघटनेचे कार्यकर्ते यांनी गाडी थांबवून बस व चालकाला काळे फासले . तसेच कर्तव्यावर असणाऱ्या चालक भास्कर जाधव यांना मारहाण देखील करण्यात आली. (दोघेही कोल्हापूर आगारात कार्यरत आहेत.) त्यानंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली आहे.

आज सकाळी विभाग नियंत्रक कोल्हापूर यांनी बस व चालक – वाहक यांना सुखरूप कोल्हापूर येथे आणले. तथापि, सीमावर्ती भागातील तणाव लक्षात घेता, परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. असे एसटी महामंडळ कडून कळवण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube