मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे.
देशमुख यांच्या सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे.
अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
देशमुख यांच्या जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.