Download App

अनिल परब-देवेंद्र फडणवीस एकत्र; राजकीय चर्चांना उधाण

  • Written By: Last Updated:

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीत. याची सुरुवात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतरच सुरू झाली होती. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर तर दोन्ही बाजूंनी होणारी टीका विखारी झाल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या नेत्यांमध्ये कमालीची कटुता निर्माण झाली. शिवसेने पडलेली फूट, संजय राऊत, अनिल परब यांच्या मागे लागलेला ईडी-सीबीआयचा ससेमिरा…. ह्या सर्व बाबी पहिल्या तर हे वितुष्ट कमालीचं टोकाला गेल्याचं दिसतं. भाजपच्या या कारवाई विरोधात अनिल परब हे मुंबई ते दिल्ली असा किल्ला लढवत आहे. मात्र, अनिल परब आणि देवेंद्र फडणवीस हे आज विधानसभेच्या दालनाबाहेर एकत्र दिसले.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज सायंकाळी विधीमंडळाचं कामकाज संपल्यानंतर विधानभवनाच्या पोर्चमध्ये पत्रकार आणि अनिल परब हे गप्पा मारत उभे होते. कसबा निवडणुकीविषयी पत्रकार आणि परब यांच्यात ह्या गप्पा सुरु होत्या. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे समोरून जात असताना अनिल परब यांनी फडणवीसांकडे बोट दाखवत पत्रकारांना सांगितलं की, कसबा पोटनिवडणुकीबद्दल यांना जास्त माहिती आहे.

मग स्वतः अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांना आवाज दिला आणि म्हटलं की, पत्रकार विचारताय कसब्याबद्दल काय? तुम्ही तुमचा अंदाज सांगा…. मग देवेंद्र फडणवीस या विषयावर बोलतांना सांगतात की, कसबा निवडणुक तशी टफ आहे… फडणवीस पुढे काही बोलणार तोच टीव्ही कॅमेरा येताच फडणसीसांनी स्वतःला सावरलं. अनिल परब हे आपल्या शेजारी उभे आहेत, हे लक्षात येताच त्यांनी या ठिकाणाहून निघून जाणं पसंद केलं. दोन नेते गेले दोन वर्ष एकमेकांशी गल्ली ते दिल्ली, जिल्हा कोर्ट ते सुप्रीम कोर्ट एकमेकांच्या एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकुन उभे आहेत. तेच आज निवांतक्षणी चर्चेत रंगणार होते. पण पत्रकारांच्या कॅमेऱ्यांमुळे त्यांची चर्चा उधळली गेली.

अहेरांनी उणीवावर बोट ठेवले, आरोग्यमंत्र्यांना आली जाग 

सत्ताधारी आणि विरोधक हे नेहमी एकमेकांवर जहरी टीका करत असले तरीही राजकारणाबाहेर त्यांच्यातील निकोप मैत्री, परस्पर संबंध अनेक प्रसंगांतून दिसून येतात. विविध सामाजिक व्यासपीठांवर विरोधी पक्षांतील नेते एकत्र दिसून येतात. त्यावर चर्चाही होतात. आजही विधानभवन परिसरात अनिल परब आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले. या प्रसंगाचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. एकिकडे राज्यात मध्यावधी निवडणूका लागतील, असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे विरोधातील पक्षनेत्यांशी सत्ताधाऱ्यांची जवळीक वाढतेय की काय अशी चर्चा सुरु आहे.

Tags

follow us