Download App

500 कोटींच्या घोटाळ्यातून माझं नाव वगळून…; दामियांनी भर पत्रकार परिषदेत ऐकवली IG सुपेकरांची क्लिप

जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.

Anjali Damania on Vaishnavi Hagavane Death : वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून तीने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, नणंद आणि सासू यांना अटक केली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे (Hagavane) हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. मात्र, प्रकरण समोर येताच त्याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, दमानिया यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली.

जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात महिला आयोगामध्ये मयुरीच्या आईने पत्र लिहिलं आहे. मेहुण्याचा आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केलं आहे. पीएसआय अशोक सादरे यांची एक आत्महत्या पूर्वीची सुसाईड नोट आहे. पैसे कलेक्ट करायला लावायचे दागिने द्यायला लावायचे दिवाळीला दागिने द्यायला लावायचे. सुपेकरांची ताकद हगवणे कुटुंबाच्या मागे उभे होती म्हणून त्यांनी हे सर्व केल्याचंही दमानिया म्हणाल्या आहेत.

जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत. कराडला सुद्धा जे समर्थन मिळालं ते सुद्धा या सुपेकरांमुळं मिळाल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय.

500 कोटीच्या घोटाळ्यामध्ये माझं नाव वगळून दुसऱ्या अधिकाऱ्यांचे नाव घाल, अमिताभ गुप्ता यांचं नाव घाल असं सुपेकर म्हणताना ऐकू येत आहे. एका ऑडिओ क्लिपमध्ये ही माहिती असल्याचे दमानिया म्हणाल्या. ही ऑडिओ क्लिप मी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे दमानिया म्हणाल्या. आताच्या घटकेला ही अन व्हेरिफाइड क्लिप असली तरी ती व्हेरिफाइड करणं सरकारच्या हातात आहे. असे म्हणत दमानिया यांनी ऑडिओ क्लिप ऐकवली.

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला महिला आयोग जबाबदार; रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, काय केली मागणी?

हगवणे कुटुंबातील सर्व आरोपींना अटक झाली, हे पाहून बरं वाटलं. अजून एक व्यक्ती आहे, त्यांनी या कुटुंबाला मदत केली होती, ते म्हणजे आयपीएस जालिंदर सुपेकर, त्यांच्याबद्दल अनेक माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाण याला बंदुकीचं लायन्सस सुपेकर यांनी दिलं. हगवणे यांची सून मयुरीच्या आईने देखील जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात महिला आयोगामध्ये पत्र दिलं होतं.

जालिंदर सुपेकरांची ताकद हगवणे कुटुंबाच्या मागे होती, म्हणूनच त्यांनी हे सर्व केलं. जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्येही त्यांनी 500 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत. कराडला सुद्धा जे समर्थन मिळालं ते सुद्धा सुपेकर यांच्यामुळेच असा गंभीर आरोप यावेळी दमानिया यांनी केला आहे.

त्याचबरोबर मयुरीला देखील जो त्रास झाला तो देखील सुपेकर यांच्यामुळेच झाला, तिच्या आईने याविरोधात महिला आयोगाला पत्र दिलं होतं. सुपेकरांवर तातडीनं कारवाई व्हायला हवी अशी मागणी यावेळी दमानिया यांनी केली आहे.

follow us