खटला फास्ट ट्रॅक कोर्टात अन् आयपीएस सुपेकरांचीही गय नाही; वैष्णवीच्या आई-वडिलांना अजितदादांचा शब्द

Vaishnavi Hagawane Death Case in fast track court and even IPS Supekar is not spared; Ajit Pawar words to Vaishnavi’s parents : बहुचर्चित पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशिल हगवणे (Sushil Hagawane) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर राजकारणासह सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या माहेरी म्हणजे कस्पटे कुटुंबाची नेत्यांकडून भेट घेतली जात आहे. त्यात आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख या नात्याने अजित पवार यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कस्पटे कुटुंबाला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा शब्द दिला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
हे प्रकरण घडल्यानंतर मी थेट पिंपरी चिंचवडचे सीपी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी मी त्यांना या प्रकरणांमध्ये कोणाचीही हयगळ करायची नाही असे आदेश दिले होते. कुणाचाही राजकीय हस्तक्षेप यामध्ये होऊ द्यायचा नाही. संबंधांना तात्काळ अटक करायची. हे प्रकरण घडलं त्यावेळी मी बाहेरगावी होतो त्यावेळी मी अनिल कस्पटे यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. त्याचवेळी मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मी जेव्हा भेट घ्यायला येईल त्यावेळी माझ्याशी मन मोकळं बोला असं सांगितलं होतं. या प्रकरणांमध्ये निलेश चव्हाण या व्यक्तीचे नाव देखील समोर आला आहे ज्याने वैष्णवीच्या बाळाला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलं होतं. त्याला देखील अटक करण्यात यावी.असं अजित पवार यांनी सांगितलं.
वेस्ट इंडिजच्या मॅथ्यू फोर्डने रचला इतिहास, ODI मध्ये ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक
तर पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, मी मुख्यमंत्र्यांबरोबर दिल्लीला जाणार आहे . त्यावेळी त्यांच्याशी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा अशी मागणी करणार आहे. त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. या प्रकरणामध्ये वैष्णवीचे मामा सासरे असलेले आयपीएस सुपेकरांचा देखील संबंध असल्यास त्यांची देखील गय केली जाणार नसल्याचा शब्द अजित पवार यांनी कस्पटे कुटुंबाला दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरणं?
पुण्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्यानं खळबळ उडाली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच तिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. या अहवालातून काही धक्कादायक माहिती उघड झाली. गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय.
एसपींचा दडुंका ! बीडमधील सहाशे पोलिसांना दणका, थेट शंभर किलोमीटर दूर बदल्या !
शुक्रवारी वैष्णवी हगवणे हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर वैष्णवीच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवीला क्रूर वागणूक दिली, असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी त्यांच्या तक्रारीत केला होता.
‘त्या’ प्रकरणी अतुल भातखळकरांविरूद्ध कॉंग्रेस आक्रमक, गुन्हा दाखल करून अटकेची मागणी
वैष्णवी हगवणेच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असू शकतो, अशी शक्यता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं या शवविच्छेदन अहवालामुळं आता या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं. वैष्णवीने आत्महत्या केली का? की, तिच्यासोबत काही घातपात घडला? असे अनेक प्रश्न या अहवालामुळे निर्माण झालेत. या घटनेप्रकरणी वैष्णवीची सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील सात दिवसांपासून फरार होते. या दोघांना शोधण्यासाठी पोलिसांचं पथक तपास करीत होतं. अखेर आज पहाटेच्या सुमारास एका छोट्याशा खेडेगावातून दोघांना अटक करण्यात आलीयं.