Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुंडे व्ही. राधा यांच्या अहवालाची महत्त्वाची फाइल गायब केल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
भिवंडीत भाजपच्या पदाधिकाऱ्याची भावासह निर्घृण हत्या, पवारांच्या खासदारावर गंभीर आरोप, प्रकरण काय?
व्ही. राधा यांनी कृषी विभागातील आर्थिक गैरव्यवहारांचा तपशील असलेला अहवाल तयार केला होता. यात नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्प्रेअर आणि कापूस बॅग्जच्या खरेदीत बाजारमूल्यापेक्षा जास्त किमतीने खरेदी झाल्याचे नमूद होते. हा घोटाळा सुमारे 275 कोटींचा असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यानंतर आज दमानिया यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, धनंजय मुंडेंनी, कृषी सचिव ‘व राधा’ यांची फाइल गायब केल्याचं म्हटलं.
धनंजय मुंडेंनी, कृषी सचिव ‘व राधा’ यांची फाइल गायब केली!
मॅडम व्ही राधा या कृषी सचिव असतांना, कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्ट ची फाइल मंत्र्यांना पाठवली. ही फाइल धनंजय मुंडे यांनी गायब केली.
आज लोकायुक्तांच्या सुनावणी दरम्यान, मी हे… pic.twitter.com/jUGsPBwIMi
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 21, 2025
सुनेत्रा पवारांची RSS च्या कार्यक्रमाला हजेरी, राजकीय चर्चांना उधाण, अजितदादा काय म्हणाले?
दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, मॅडम व्ही राधा या कृषी सचिव असतांना, कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाइल मंत्र्यांना पाठवली. ही फाइल धनंजय मुंडे यांनी गायब केली. आज लोकायुक्तांच्या सुनावणी दरम्यान, मी हे लोकायुक्तांपुढे मांडल्यानंतर, प्रतिभा पाटील नावाच्या उप सचिवांनी लोकायुक्तांना कन्फर्म केले, की ही फाइल मंत्र्यांना दिल्याचा जावक क्रमांक आहे, पण ही फाईल त्यांच्या कडून राजीनाम्यानंतर परत आली नाही, असं दमानिया यांनी म्हटलं.
धनंजय मुंडे यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश लोकायुक्तांकडून देण्यात आले आहे. आत्ता ५ मिनिटापूर्वी मला शासनाकडून हे पत्र पाठवण्यात आले आहे, असंही दमानिया यांनी म्हटलं.