Anjali Damania on Dhananjay Munde Agri Scam : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania)यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर हत्याप्रकरणाशी संबंध आणि कृषीमंत्री असताना केलेल्या कृषी घोटाळ्याचे देखील आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावर आजही पत्रकार परिषद घेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी बोलताना दमानिया म्हणाल्या की, काही पक्षाच्या प्रवक्त्यांना प्रश्न पडला आहे की, धनंजय मुंडे यांचा आणि संतोष धेशमुख यांच्या हत्येचा काय संबंध? हे सगळे मी ॲाफिस ॲाफ प्रॅफीट घोटाळे हे मुद्दे का घेत आहे? पण जर क्रम बघितला तर 4 तारखेला मी प्रेस घेतली. 6 तारखेला मी प्रोडक्ट मागवले. त्यावर 7 तारखेला बंदी घातली. यावर इफ्कोच्या एका अधिकाऱ्याने मला सांगितले की, इफ्कोमध्ये किती घोटाळे होतात? तिथल्या सीईओपासून सगळे कसे भ्रष्टाचार करतात?
दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता की परवेश वर्मा, RSS अन् भाजप नेतृत्व कुणाला देणार पसंती ?
त्यानंतर आज मी कृषी घोटाळा दाखवत आहे. या पत्रावर तारीख नाही. त्यात त्यांनी लिहिले आहे की, 23 आणि 30 तारखेच्या कॅबिनेट बैठकीत हे निर्णय झाले आहेत. मात्र त्या दोन्ही दिवसांच्या बैठकीत कृषी विभागाचा कुठलाही निर्णय झाला नाही. त्याचे देखील जीआर काढण्यात आले आहेत. हा मंत्री कुठल्या थराला जातो ते पाहा. खोटं बोलून धनंजय मुंडे हे मांडत आहे. हे जर इतके खोटे बोलत असतील. हा मंत्री मंत्रीमंडळात न झालेला निर्णय झाला म्हणून सांगतात. दोनशे कोटींचा हा घोटाळा आहे. असा आरोप यावेळी दमानिया यांनी करत पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.