Anna Hazare On Sindur Operation : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये निरपराध भारतीय नागरिक मारले गेले. मात्र आता एअर स्ट्राईक करत भारताने देखील या हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने अतिरेक्यांविरोधात केलेली ही कारवाई जगासमोर मोठे उदाहरण आहे. यापुढे आता कोणाची हिंमत होणार नाही अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केंद्र सरकारच्या या पाऊलचे समर्थन केले आहे.
पहलगम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून एयर स्टाईल करत पाकिस्तानमधील (Pakistan) नऊ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. यावर आता देशभरातून प्रतिक्रिया समोर येत आहे. नवीन भारताकडून उचलण्यात आलेल्या पाऊलाचे स्वागत करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.
यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, भारतातच्या सैन्यांचे अभिनंदन हे शब्दानेही करता येणार नाही एवढे मोठे सुंदर काम त्यांनी केले आहे. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी कोणतेही कारण नसताना आमचे 26 लोक मारले. जे 26 लोक मारले गेले त्यांचा बदला भारताने घेतला. जगामध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारे अतिरेक्यांकडून हल्ला केला जातो. भारताने अतिरेक्यांविरोधात केलेली ही कारवाई जगासमोर मोठे उदाहरण आहे. यापुढे आता कोणाची हिंमत होणार नाही. पाकिस्तानच्या गरज जाऊन पाकिस्तान मध्ये प्रवेश करत अतिरेकंडे ज्या ठिकाणी तळ आपले तयार केलेले आहे ते तळ उडवून भारताने आपली ताकद ही जगाला दाखवून दिली आहे अशा शब्दात एक प्रकारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या एअर स्ट्राइकचे समर्थन केले आहे तसेच केंद्र सरकारचे देखील त्यांनी आभार मानले आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तान असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली होती. यानंतर भारताकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. सर्वातआधी भारताने पाकिस्तानसबोत असणारा सिंधू जल करार रद्द केला आणि देशात असणाऱ्यासर्व पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते.
पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती, आम्ही स्वागत करतो; इम्तियाज जलील पाकिस्तानवर भडकले
तर आता भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत बदला घेतला आहे. या कारवाईनंतर भारताने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील किमान 18 विमानतळ बंद करण्यात आले आहेत, ज्यात श्रीनगर, जेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाला आणि जामनगर यांचा समावेश आहे.