पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती, आम्ही स्वागत करतो; इम्तियाज जलील पाकिस्तानवर भडकले

पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती, आम्ही स्वागत करतो; इम्तियाज जलील पाकिस्तानवर भडकले

Imtiaz Jaleel : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) मोठी कारवाई करत पाकिस्तानवर हवाई हल्ला करत बदला घेतला आहे. भारताने या कारवाईला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असा नाव दिला आहे. या ऑपरेशन अंतर्गत भारताने पाकिस्तानातील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा 9 ठिकाणी हवाई हल्ले केले आहे.  भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी स्वागत केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

यावेळी इम्तियाज जलील म्हणाले की, आज जो भारताने हल्ला केला आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती, ते भारताने केले. यामुळे भारतीय आनंदी आणि संतुष्ट आहे. सर्व देशवासीयांची हीच भावना होती. उरी, पुलवामा, वैष्णोदेवी आणि पहलगाम हल्ल्यामुळे देश वासियांमध्ये राग होता. दहशतवादी तळावर हल्ला करावा, मात्र सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतील. आपली संस्कृती वेगळी आहे. असं माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्ध होत होते, त्या काळी महाराज व मावळे कधीही मुल आणि महिलांवर हात टाकत नव्हते.असं देखील माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

तर डोनाल्ड ट्रम्प विश्वास ठेवण्यासारखे नाही. अमेरिकेत त्याचा विरोध होत आहे. तो विचित्र माणूस आहे. तसेच हा हल्ला नाही, आत्मसरक्षणासाठी भारताने उचललेले पाऊल आहे. हा भारताचा अधिकार आहे. असं देखील यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

22  एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तान असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली होती. यानंतर भारताकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. सर्वातआधी भारताने पाकिस्तानसबोत असणारा सिंधू जल करार रद्द केला आणि देशात असणाऱ्यासर्व पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते.

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताचा मोठा निर्णय, धर्मशाळा विमानतळ बंद, आयपीएल सामने रद्द होणार?

तर आता भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत बदला घेतला आहे. या कारवाईनंतर भारताने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील किमान 18 विमानतळ बंद करण्यात आले आहेत, ज्यात श्रीनगर, जेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाला आणि जामनगर यांचा समावेश आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube