कृषीप्रधान देश म्हणतात अन् शेतकऱ्यांच्याच शेतमालाला भाव नाही… अण्णा हजारे

Anna Hazare :  शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच नुकतेच कांद्याच्या दराला अत्यंत किरकोळ भाव

Anna Hazare

Anna Hazare

Anna Hazare :  शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच नुकतेच कांद्याच्या दराला अत्यंत किरकोळ भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत आहे मात्र सरकार यावर कोणताही ठोस निर्णय घेतला असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे यावरती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली तसेच कृषी प्रधान देश मनवतात आणि याच देशात शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळत नाही हे देशाचं दुर्दैव अशी शब्दात हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) म्हणाले की कृषिप्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांची अवस्था खूप दुर्दैवी आहे. आपण एकीकडे कृषीप्रधान शेतकऱ्यांचा देश म्हणून तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य बाजार भाव मिळत नाही ही गोष्ट दुर्दैवी आहे. शेतीचे बाजार भाव हे उत्पन्नावर आधारित पाहिजे शेतकरी जेवढा खर्च करतो तेव्हा त्याला अधिक उत्पन्न कसे मिळेल यावर भाव हे आधारित पाहिजे असं जर झालं तर देशातला शेतकरी अडचणीत येणार नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आधीच बाजार भाव मिळत नसल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर निसर्गाचा प्रकोपामुळे दुहेरी संकटाला बळीराजाला सामोरे जावे लागत आहे.

एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार – प्रताप सरनाईक

कांद्यासाठी विरोधक एकवटले

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी आक्रमक झाल्या असून राज्यात ठीक ठिकाणी जोरदार रस्ता रोको करण्यात येत आहे कांद्याच्या दरावरून नाशिक जिल्ह्यातील चांदवड मध्ये महाविकास आघाडीचे रोहित पवार आंबासाहेब दानवे साहेब हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलन छेडले आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा देखील विरोधक म्हणाले.

Exit mobile version