30 जानेवारीपासून अण्णा हजारेंचं पुन्हा उपोषण; लोकाआयुक्तच्या अंमलबजावणीसाठी उभारणा लढा

Anna Hazare यांनी लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने 30 जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे.

Anna Hajare

Anna Hazare to resume hunger strike from January 30; Struggle to implement Lokayukta : विधानसभेनंतर आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये देखील लोकायुक्त सुधारणा विधेयकाला मंजूर देण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे याच कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत हा इशारा दिला यामध्ये त्यांनी आंदोलनाची तारीख देखील जाहीर केली आहे.

देवेंद्र फडणवीस कंजूष…, अंबादास दानवेंच्या आरोपांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्युत्तर

या पत्रामध्ये अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे की, लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आपण हे उपोषण करत आहोत. 30 जानेवारी 2026 पासून राळेगणसिद्धी या ठिकाणी हे उपोषण केले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने 2022 23 मध्येच लोकायुक्त विधेयक मंजूर केले. मात्र दोन वर्षे होऊन देखील या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने हजारे यांनी हा उपोषणाचा इशारा दिला आहे.

लोकायुक्त सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर! विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेकडूनही शिक्कामोर्तब

अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये या कायद्यासाठी मोठं जनांदोलन उभारलं होतं. त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचार मुक्त भारताचा नारा देत या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळवला होता. त्यानंतर देशासह महाराष्ट्रात सत्ता पारट झाल्याचे पाहायला मिळालं होतं.

follow us