Download App

फडणवीसांची सगळी गणितं फेल करणार; सरपंच-उपसरपंच म्हणत जरांगेंनी घेरलं….

येत्या चार-पाच दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. आमचे प्रश्न सोडवा. अन्यथा या गोष्टीला फडणवीस जबाबदार असतील असं जरांगे म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : एक वर्ष झालं आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे मांडत आहोत. (Manoj Jarange) एखाद काम करायला वेळ लागतो हे आम्ही समजू शकतो. पण वेळ म्हणजे किती? वर्ष होऊनही जर निर्णय होत नसतील तर आम्ही काय समजायचं? असा प्रश्न उपस्थित करत जर लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करणार नसाल तर होणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोर जावं लागेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

फडणवीसांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार विरोधात बोलणार नाहीत; जरांगे पाटील असं का म्हणाले?

तर फडणवीस जबाबदार असतील

आम्ही राजकीय भाषा बोलत नाहीत, बोलणारही नाहीत. परंतु, आता देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये स्वत: लक्ष घालावं. अन्यथा मराठ्यांचं जे काही नुकसान झालं आहे त्याला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. जी संधी मिळाली त्या संधीच देवेंद्र फडणवीस यांनी सोनं करावं असंही ते यावेळी म्हणाले आहेत. आम्हाला काम चालू आहे असं म्हणून येड्यात काढू नका, आम्ही काय मुर्ख नाही असंही ते यावेळी म्हणाले.

तर खेळ खलास

यावेळी तुम्हाला सुट्टी नाही.  येत्या दोन ते तीन दिवसांत आमच्या सर्व मागण्या पूर्ण करुन टाका. आम्हाला राजकारणाचं काही देणघेण नाही. परंतु, हे जर तुमच्याकडून झालं नाही तर माझ्या नावाने 2024 ला बोंबलू नका हे काय झालं. कारण तुमच्या जीवनात तुम्हाला पश्चाताप झाला नसेल इतका पश्चाताप होईल. मी जर रस्त्यावर उतरलो तर पूर्ण उद्वस्त होऊन जाईल तुमचं करीअर असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसंच, वर्षभर जगात कुणीच असा समाज नाही जो सहकार्य करतो. त्यामुळे फडणवीसांना विनंती आहे त्यांनी हा विषय मार्गी लावावा असंही ते म्हणाले आहेत.

विधानसभेपूर्वी सावध पवित्रा; मराठा आरक्षणावर मोठा निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री ऍक्शन मोडवर

सर्व काही तेच पाहतात

मागच्या काही दिवसांत अनेकांनी माझ्यावर भाष्य केलं. परंतु, मी आता राजकीय भाषा बोलत नाही. आणि बोलणारही नाही. परंतु, तुम्ही जर हा विषय असाच लांबवला, भिजत घोंगड ठेवलं तर तुम्हाला जड जाईल. मला राजकारणात काही उतरायचं नाही. त्यामुळे फडणवीसांनी हा विषय मार्गी लावावा. कारण सरकारमध्ये सरपंच काही करत नाही उपसरपंचच सगळ काही गाडा हाकत आहेत. त्यामुळे त्यांनी लवकर विषय मार्गी लावावा असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

follow us