Anupama’s new chapter : मालिका विश्वातील अग्रगण्य चॅनल असलेल्या स्टार प्लसची “अनुपमा” ही मालिका चॅनल वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी ओळखली जाणारी मालिका असून आता ती एक वळण घेत असल्याचं बघायला मिळतंय. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट आणि तिची रंजक कथा प्रेक्षकांना कायम गुंतवून ठेवणार आहे. मालिकेत अनुपमा तिच्या आयुष्यातील अनेक अडचणींना सामोरे जात असतानाही सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करताना दिसते आणि स्वतःची ओळख एका उद्देशातून शोधताना दिसते.
या भूमिकेत असलेल्या रुपाली गांगुली यांनी सध्याच्या कथानकाबद्दल काही खास माहिती शेअर केली आहे असून सध्या मालिकेत अनुपमा पुन्हा एकदा तिचं आयुष्य नव्याने उभारताना बघायला मिळणार आहे. गोव्यात ती नवीन आव्हानांना सामोरे जात असताना कॅफे सुरू करण्याच्या स्वप्नाचा नवी भरारी घेताना दिसणार असल्याचं कळतंय. मालिकेतील नव्या ट्विस्ट बद्दल बोलताना रुपाली सांगते “लीपनंतर अनुपमाच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे आता ती एका नव्या शहरात गोव्यात पूर्णपणे नव्याने आयुष्य उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या तिच्यासाठी जगणं आणि पुढे जाणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे त्यामुळे तिला जे काम मिळेल ते ती करते. हॉटेल स्टाफ म्हणून काम करणं असो किंवा साफसफाईत मदत करणं असो या टप्प्याचं भावनिक वैशिष्ट्य म्हणजे इतकं सगळं सहन करूनही अनुपमा अजूनही आशा सोडत नाही तर जिद्दीने पुढे जाताना दिसणार आहे” पुढे रुपाली सांगते “प्रेक्षकांना अनुपमाच्या संघर्षाची तिच्या एकटेपणाची आणि या अनोळखी शहरात स्वतःला सावरत असलेल्या तिच्या शांत ताकदीची झलक पाहायला मिळेल.
अनुपमाने नेहमीच तिची ओळख एका उद्देशातून शोधली आहे ते नृत्य असो वस्ती साठी उभं राहणं असो किंवा “अनु की रसोई” चालवणं असो आणि आता गोव्यात ती पुन्हा एकदा कॅफे उभारण्याच्या स्वप्नातून तिचा नवा उद्देश शोधत आहे” मालिकेतील अनुपमाच्या भूमिकेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या “एक कलाकार म्हणून अनुपमाच्या या नाजूक पण आशावादी बाजूला साकार करणं माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांनी तिच्या या प्रवासाशी जोडलेलं राहावं आणि या नव्या टप्प्यात तिला साथ द्यावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे”
प्रेक्षक आता उत्सुकतेने पाहत आहेत की गोव्यात नव्याने आयुष्य सुरू करताना अनुपमा तिच्या संघर्षांवर कशी मात करणार आणि पुढे कथा कशी रंगत जाणार. अनुपमा बघायला विसरू नका दररोज रात्री 10 वाजता फक्त स्टार प्लसवर!
