Download App

APMC Election : मनमाड बाजार समितीमध्ये आमदार सुहास कांदे यांना धक्का, अवघी 1 जागा मिळाली

  • Written By: Last Updated:

APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे.

या दरम्यान अकोला बाजार समितीचा निकाल हाती आला आहे. मनमाड बाजार समितीचा निकाल हाती आला आहे. मनमाड बाजार समितीमध्ये शिंदे गटाचे आ.सुहास कांदे यांना मोठा धक्का बसला आहे. तर महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे.

देशात घटस्फोट घेणं सोपं का नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं ‘हे’ बदलणार

मनमाड बाजार समितीमध्ये 18 पैकी 14 जागेवर भुजबळ गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर सुहास कांदे यांच्या गटाला अवघी 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे सुहास कांदे गटाचा दारुण पराभव झाल्याचं पाहायला मिळतं आहे. व्यापारी गटातून व्यापारी विकास पॅनल विजयी पॅनलला 2 जागा मिळाल्या आहेत तर हमाल मापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. भुजबळ गटाचे नेते माजी आमदार संजय पवार व शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक विजयी झाले आहेत.

दरम्यान नाशिक मधील नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या गटाने 18 पैकी 16 जागा जिंकत नांदगाव बाजार समितीवर एकहाती सत्ता आणली. त्यांनी महाविकास आघाडीच्या गटाचा सुपडा साप केला आहे. पण मनमाड मध्ये मात्र कांदे यांना धक्का बसला आहे.

चॅलेंज दिलं, पराभव झाला आता बांगर मिशा कधी काढता?

Tags

follow us