कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके आणि ‘AAP’ संबंधांवर अर्चना दिपके यांनी दिलं स्पष्टीकरण

दिपके यांचा पूर्वी आम आदमी पार्टी सोबत संबंध होता, अशी माहिती त्यांच्या वाहिनी जिल्हा परिषद सदस्या अर्चना दिपके यांनी बोलताना दिली आहे.

Untitled Design 70 1

Untitled Design 70 1

Archana Deepke clarifies on AAP ties : सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्याविषयी मोठा खुलासा समोर आला आहे. दिपके यांचा पूर्वी आम आदमी पार्टी सोबत संबंध होता, अशी माहिती स्वतः त्यांच्या वाहिनी तथा जिल्हा परिषद सदस्या अर्चना दिपके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मात्र, सध्याची कॉकरोच जनता पार्टी ही कोणत्याही राजकीय पक्षाची शाखा नसून बेरोजगार तरुणांच्या संतापातून उभी राहिलेली उपहासात्मक डिजिटल चळवळ असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं.

अर्चना दिपके यांनी सांगितले की, अभिजित दिपके यांनी 2020 ते 2023 या कालावधीत आम आदमी पार्टीसाठी स्वयंसेवक आणि डिजिटल रणनीतीकर म्हणून काम केले होते. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. त्या भेटीनंतर सामान्य माणसासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपसोबत सक्रियपणे काम करण्यास सुरूवात केली.

अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट? संदीप कोतकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्या सोहळ्याला देखी आम्ही संपूर्ण कुटुंब उपस्थित होतो. अभिजीतने पक्षासाठी डिजिटल पातळीवर मोठं काम केलं. मात्र, नंतर त्यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला आणि सध्या ते अमेरिकेतच आहेत. दरम्यान, अभिजित दिपके यांनी देखील विविध मुलाखतींमध्ये आपसोबतच्या जुन्या संबंधांची कबुली दिली आहे. मात्र, सध्या ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉकरोच जनता पार्टी ही बेरोजगारी, पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि तरुणांच्या नैराश्याविरोधातील आवाज आहे, असे दिपके यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, मुख्य न्यायाधीशांच्या कथित कॉकरोच वक्तव्यानंतर सोशल मीडियावर उदयास आलेल्या या उपहासात्मक मोहिमेला तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. काही दिवसांतच कॉकरोच जनता पार्टी हा डिजिटल ट्रेंड बनला आणि लाखो तरुण या मोहिमेशी जोडले गेले. आता अभिजित दिपके यांच्या आप कनेक्शनची चर्चा रंगू लागली असली, तरी त्यांच्या समर्थकांचा दावा आहे की, ही चळवळ कोणत्याही पक्षासाठी नसून बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या भावनांचे प्रतीक आहे,

Exit mobile version