अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट? संदीप कोतकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ

माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव अचानक विधान परिषदेच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 67 1

Discussions about Sandeep Kotkar joining BJP : अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या राजकारणात मोठे धक्कातंत्र पाहायला मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोतकर यांनी पडद्यामागून सुरू केलेल्या राजकीय हालचाली आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संदीप कोतकर यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत असून, पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी शिर्डीत होणाऱ्या कार्यक्रमात कोतकर यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीच्या समीकरणात अचानक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

‘राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात’, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर मुश्रीफांचा आक्षेप…

चार वर्षांपासून रिक्त असलेल्या या विधान परिषद जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. जानेवारी 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जागा रिक्त राहिली होती. आता निवडणुकीचा बिगुल वाजताच अनेक इच्छुक सक्रिय झाले असले, तरी संदीप कोतकर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे.

या शर्यतीत माजी आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह कोतकर यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कोतकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी वाढवलेला संपर्क, त्यांची संघटनात्मक ताकद आणि आर्थिक क्षमता यामुळे भाजप नेतृत्व त्यांच्याकडे गंभीरपणे पाहत असल्याचे बोलले जात आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान कोतकर परिवाराने घेतलेली भूमिका देखील आता पुन्हा चर्चेत आली आहे. सुवर्णाचे कोतकर निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या, मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीत भानुदास कोतकर यांनी देखील जोरदार तयारी करून शेवटच्या क्षणी माघार घेतली. सलग दोन मोठ्या निवडणुकांमधून मागे राहिल्यानंतर आता कोतकर परिवार विधान परिषदेसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीत नगरसेवक निर्णायक भूमिका बजावणार आहेत. जिल्ह्यात भाजपकडे सर्वाधिक मतदारसंख्या असल्याने अनेक इच्छुक भाजपच्या छत्राखाली येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत कोतकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

Maratha Reservation : …तर माझ्या आमदाराकीचा राजीनामा देईल; प्रसाद लाड यांनी ठणकावून सांगितलं

भाजप नेतृत्वाला देखील स्थानिक पातळीवर मतदारांची प्रभावी जुळवाजुळव करू शकणारा आणि निवडणुकीत ताकदीनिशी उतरू शकणार उमेदवार हवा असल्याची चर्चा आहे. कोतकर यांच्याकडे ही क्षमता असल्यानेच पुण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या चर्चेची पहिली फेरी पार पडल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.

दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे प्राजक्त तनपुरे यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्याचा पर्याय चर्चेत आहे. मात्र, तनपुरे यांच्याकडून अद्याप स्पष्ट सकारात्मक संकेत मिळत नसल्याने भाजपच्या गोटातील समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. दुसरीकडे, आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांच्या नावाची देखील सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या समर्थकांकडून नेक्स्ट एमएलसी अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने जगताप कुटुंबियांचंही भूमिका काय राहणार, याकडे देखील राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं आहे.

या समौजेनं घडामोडींमध्ये आणखी एक महत्वाचा धागा म्हणजे आमदार अक्षय कर्डीले आणि संदीप कोतकर यांचे कौटुंबिक नाते. कर्डीले हे कोतकर यांचे मेहुणे आहेत. राहुरी पोटनिवडणुकीत सुवर्णा कोतकर आणि उदयनराजे कोतकर यांनी अक्षय कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे भविष्यात कर्डिले-कोतकर हे एकाच राजकीय व्यासपीठावर दिसण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार असून, भाजप अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आणि संदीप कोतकर यांची राजकीय खेळी किती यशस्वी ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

follow us