‘राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात’, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर मुश्रीफांचा आक्षेप…
संजय शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल कसे बोलू शकतात? असा थेट सवाल करीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केलीयं.
HAsan Musrif On Sanjay Shirsath : गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये खदखद सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. अशात शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला आहे.
देशात पुढील 20 वर्ष फक्त भाजपच; ‘Axis My India’ चे प्रदीप गुप्ता यांचा मोठा दावा
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना डावलल्याच्या चर्चा सुरु होत्या. तटकरे पटेल यांना डावलून पक्षात काही निर्णय घेतले जात असल्याचं बोललं जात होतं. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचं एक पत्र व्हायरल झालं. या पत्रामध्ये या दोन्ही नेत्यांची नावे नसल्याने राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी हायजॅक केल्याच्याही चर्चा सुरु होत्या. याचदरम्यान, खासदार सुनिल तटकरे यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अंतर्गत कलहावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं गेलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संपूर्ण घडामोडींनंतर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय. ते म्हणाले, कोणाची काही चूक झाली या वादात्मक गोष्टी आहेत. अंतर्गत गोष्ट वेगळी, पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही लोकं आमच्या संपर्कात असून आमच्याशी बोलतात. कोणाच्या नेतृत्वात काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलायं हे नाकारता येत नाही, त्यांच्या पक्षात काय घडतंय हे काही दिवसांत कळेलंच, असं संजय शिरसाट म्हणाले होते.
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक
शिरसाट यांच्या या विधानावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेत संजय शिरसाट आमच्या पक्षावर कसे बोलू शकतात? असा थेट सवाल त्यांनी मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांना केला. त्यावर त्यांना समज दिल्यानंतरही त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षावर भाष्य केलं. त्यामुळे आता पुढील काळात मंत्री संजय शिरसाट यांनी काही भाष्य केल्यास आम्ही त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि महायुतीतील मतभेद पुढील आठवड्यापर्यंत संपतील. कोणीही आमदार भेटलेले नाही जे कोणी भेटले असतील ते शरद पवारांच्या प्रेमापोटी भेटलेले आहेत. सुनेत्रा पवार यांच्यामागे सर्व आमदार ठामपणे उभे असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलंय.