देशात पुढील 20 वर्ष फक्त भाजपच; ‘Axis My India’ चे प्रदीप गुप्ता यांचा मोठा दावा

Axis My India : लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक या निवडणूकीत भाजप अगदी सहज बाजी मारताना गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे.

Axis My India

Axis My India : लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक या निवडणूकीत भाजप अगदी सहज बाजी मारताना गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. आज देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आणखी किती वर्ष देशात भाजपची सत्ता असणार सध्या याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे पुढील 20 वर्षा देशात भाजपची सत्ता असणार असल्याचा दावा  ‘Axis My India’ चे प्रमुख प्रदीप गुप्ता यांनी केला आहे.

जोपर्यंत सत्ताधारी पक्षाची प्रशासकीय कामगिरी अत्यंत खालावणार नाही, तोपर्यंत त्यांचे स्थान सुरक्षित राहील असं प्रदीप गुप्ता (Pradeep Gupta) म्हणाले. प्रदीप गुप्ता यांच्या ‘Axis My India‘ ने घेतलेली बहुतेक सर्वेक्षणे आणि एक्झिट पोल्स अचूक ठरले आहेत. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोल्सच्या वेळी त्यांचा अंदाज चुकला होता.

पीटीआय भाषाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रदीप गुप्ता म्हणाले की, राजकारणाची एक विशिष्ट लय असते. पूर्वी, 1977 पर्यंत काँग्रेसने सलग सत्ता गाजवली. त्यानंतर मात्र त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्या काळात आम्ही साधारणपणे 20 वर्षे टिकणाऱ्या ‘राजकीय पिढी’बद्दल (political generation) बोलत असू. ते 20 वर्षांचे चक्र आजही तितकेच समर्पक ठरते.

भाजप देखील दीर्घकाळापर्यंत भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून कार्यरत राहू शकतो. इतका प्रचंड जनादेश मिळाल्यामुळे, भाजप कडूनच्या अपेक्षा साहजिकच वाढल्या आहेत. त्यामुळे, आता भाजप आणि ‘एनडीए’ (NDA) ला अत्यंत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी करून दाखवावी लागेल. जोपर्यंत त्यांची कामगिरी खालावणार नाही किंवा त्यात बिघाड होणार नाही, तोपर्यंत त्यांचा विजय होत राहील तर दुसरीकडे, विरोधी पक्षांना मात्र पराभवाचा सामना करावा लागेल.

महागाईत शेतकऱ्यांना दिलासा; ‘या’ दिवशी होणार कर्जमाफी; CM फडणवीसांची मोठी घोषणा-

जरी तुम्ही 2019 पर्यंतचा (पुढचा) काळ विचारात घेतला, तरी त्याचा अर्थ असा होतो की (काँग्रेस पक्ष) साधारणपणे 15 वर्षे सत्तेबाहेर राहील. माझा असा विश्वास आहे की, संपूर्ण देशाचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी त्यांना किमान आणखी पाच वर्षे लागतील. जेव्हा तुम्ही यशाची उत्तुंग शिखरे गाठता, तेव्हा कालांतराने काही प्रमाणात अधोगती अनुभवण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असतेच. भाजपनेही आता अशी पातळी गाठली आहे, जिथे त्यांच्या कामगिरीबाबतच्या अपेक्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे असं देखील ते म्हणाले.

follow us