डॉ. प्रदीप कुरुलकरने डीआरडीओची गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे उघडकीस; एटीएसकडून चार्जशीट दाखल

Dr. Pradeep Kurulkar : डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Former DRDO Director Dr. Pradeep Kurulkar) प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. कुरुलकर याने पाकिस्तानी हेरांना गोपनीय माहिती पुरवल्याचं पोलीस तपासात उघड झालं. या प्रकरणात एटीएसने त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. त्याच्याविरुद्ध दोन हजार पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आलं.
‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून कुरुलकर याने एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही.आर. कछरे यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी या प्रकरणाच्या आरोप निश्चितीचा मसुदा सादर केला.
काय आहे प्रकरण?
डॉ. प्रदीप कुरुलकर याच्यावर पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. ‘झारा दासगुप्ता’ नावाच्या पाकिस्तानी महिलेसोबत त्याची सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि झाराने कुरुलकर यांना आपल्या जाळ्यात ओढले. कुरुलकर याने झाराला डीआरडीओमधील काही महत्त्वाची कागदपत्रे आणि गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे.
दरम्यान, पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती पुरवल्याच्या आरोपावरून प्रदीप कुरुलकर याला ४ मे २०२३ रोजी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती.
एटीएसच्या तपासात काय समोर आले?
एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. कुरुलकर आणि झारा यांच्यातील संवादामध्ये अनेक संवेदनशील गोष्टी उघड झाल्या आहेत. झाराने कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये फसवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवली, असा एटीएसचा दावा आहे.
एटीएसने या प्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कछरे यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यात कुरुलकर यांच्यावर शासकीय रहस्य कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू होईल, असे म्हटले आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेच बिगूल वाजलं; यंदा १८ वा हंगाम खेळला जाणार, वाचा सविस्तर वेळापत्रक
कुरुलकर यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. तसेच, विशेष न्यायालयात आरोपमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी शेअर केलेली माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये होती, असा युक्तिवाद त्यांचे वकील हृषिकेश गानू यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत, कुरुलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे
सरकारी वकील काय म्हणाले?
दरम्यान, बोलताना विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार म्हणाल्या,आम्ही विशेष न्यायाधीश व्ही. आर. कछरे यांच्या न्यायालयात या प्रकरणातील आरोपपत्र सादर केले आहे. कुरुलकर याच्याविरुद्ध अधिकृत गुपिते कायद्याच्या कलम ३ (१) (सी), ४ आणि ५ अंतर्गत आरोपपत्रे निश्चित करण्यात आली आहेत. लवकरच खटल्याची कार्यवाही सुरू करू.