कुरुलकरवरुन पटोलेंचा RSS वर निशाणा; म्हणाले, याच्या चार पिढ्या संघाच्या…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T123408.405

Nana Patole On Congress :  काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व आरएसएसवर निशाणा साधला आहे. डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याला हनीट्रॅप प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली आहे. कुरुलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे संघाच्या गणवेषातील व्हिडीओदेखील समोर आले आहेत. यावरुन नाना पटोले यांनी भाजप व आरएसएसवर निशाणा साधला आहे.

कुरुलकर हे आरएसएसशी संबंधित आहे. आरएसएस ही वैचारीक संस्था आहे. असा आरएसएसचा माणूस देशाची माहिती पाकिस्तानला देत असेल तर यावर आरएसएसने उत्तर द्यायला पाहिजे. यानंतर आरएसएसने उत्तर दिले की त्याचा आणि आमचा संबंध नाही. पण कुरुलकर स्वत त्या व्हिडीओमध्ये सांगत आहे की, ही आमची आरएसएसमधील चौथी पिढी आहे, असे पटोले म्हणाले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे-गौरव बापट भेट, भाजपचा पुण्याचा उमेदवार ठरला?

यावर आरएसएसने उत्तर दिले पाहिजे. सत्य बोलले पाहिजे. आरएसएसचे लोकं सत्य बोलणारे आहेत. याबाबत आरएसएस आणि केंद्र सरकारने उत्तर दिले पाहिजे. केंद्र सरकारला याबाबत माहीत नव्हते का, अशा शब्दात पटोलेंनी टीका केली आहे.  विध्वंस लोकं, देशाला बरबाद करणारी व्यवस्था ज्या माध्यमातून तयार झाली, त्यावेळेस आरएसएसला आणि केंद्रातील सरकारला ते महिती नव्हतं का? या प्रश्नांची उत्तरे आरएसएस आणि केंद्रातील सरकारने द्यावीत”असे नाना पटोले म्हणाले आहेत.

Gutami Patil च्या कार्यक्रमात पुन्हा राडा, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

दरम्यान, पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. यानंतर आता आणखी एका अधिकाऱ्याचा फोन ATS ने जप्त केला आहे. कुरुलकरांच्या फोन कॉल यादीत या अधिकाऱ्याचं नाव पुढे आल्यानंतर या अधिकाऱ्याचा फोन जप्त करण्यात आला आहे. कुरूलकरांनी ब्रह्मोस, अग्नी आणि उपग्रहरोधी क्षेपणास्रांची माहिती पाकिस्तानाला पुरवल्याची बाब समोर आली आहे.

 

Tags

follow us