Arvind Sawant : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी, पत्रकार परिषद घेत शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीवर तसेच मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून टीकास्त्र सोडले. तसेच यावेळी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर त्यांना आंदोलनाचा इशारा देखील दिल्याचं पाहायला मिळालं.
वेळ आल्यास आंदोलन करणार…
अरविंद सावंत म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने सर्व विभागात नोकर भरती थेट करायची नाही. तर ती एजन्सी मार्फत करायची असा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 9 कंपन्यांना हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपन्या कोणाच्या हा वेगळा भाग आहे. त्यात कंत्राटदारांना 15 टक्के कमिशन दिलं जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ही कपात केली जाणार आहे. एवढी कपात केल्यानंतर कर्मचाऱ्याला 60 टक्के पगार येणार. पुढे जीआर मध्ये म्हटलं आहे की 5 वर्ष त्याच वेतनावर काम करावं लागणार. वेतन वृद्धी नाही. असं सावंत म्हणाले.
‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं
त्याचबरोबर यावेळी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेतील व्हायरल व्हिडीओवर देखील टीका केली ते म्हणाले, मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. पण ते काय म्हणाले, ‘बोलू आणि निघून जाऊ’. त्यावरून किती गांभीर्य आहे हे समजून जा मराठा समाज, ओबीसी समाजाने हे लक्षात घ्यावं. यांचे राहिले किती दिवस…बोलून निघून जाऊ…तीन चार महिने काढू आणि निघून जाऊ. अशा अर्थाचं मुख्यमंत्री बोलले असं सावंत म्हणाले.
Dono Song: राजवीरच्या ‘डोनो’ चित्रपटातील गाण्याचे पुण्यात होणार भव्य लाँचिंग
त्यामुळे जसा शेतकरी आंदोलन करत आहेत. तशा कामगार संघटना कंत्राटीकरणाच्या विरोधात आंदोल करण्याच्या तयारीत आहेत. मुद्रा स्टार्ट अप सगळं बोगस आहे. राज्य सरकारला आम्ही खडा सवाल विचारणार, वेळ आल्यास आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर या देशातील घटनेत बदल केले पाहिजेत. घटनादुरुस्ती केली तरच हे आरक्षण टिकेल. डबल इंजिन आहे ना? करा मग घटनादुरुस्ती. उद्याच्या अधिवेशनात हे आणा, मंदिराबद्दलही उद्धवजी म्हणाले कायदा करा.
कुणाला भरावं यावर निर्बंध नाहीत, sc st obc किती काय हे पाहिलं जात नाही. हे आरक्षण बंद करण्याचा डाव आहे. मराठा समाजाचा मुद्दा काल आला का?मुख्यमंत्र्यांचा विहिडीओ बघा, ओबीसी आरक्षण दिलं नाही तर राजीनामा देईन. बोलले होते ना? एका अक्षरावरून धनगरांना आरक्षण मिळत नाहीय.. खेळताय त्यांच्यासोबत तुम्ही याचा निषेध करावा तितका कमी भारतीय कामगार सेना उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनात काम करतोय… यावर आंदोलन छेडू म्हणजे छेडूच. असा इशारा यावेळी अरविंद सावत यांनी दिला आहे.