Dono Song: राजवीरच्या ‘डोनो’ चित्रपटातील गाण्याचे पुण्यात होणार भव्य लाँचिंग

Dono Song: राजवीरच्या ‘डोनो’ चित्रपटातील गाण्याचे पुण्यात होणार भव्य लाँचिंग

Dono : अवनीश बडजात्या दिग्दर्शित ‘डोनो’ या त्याच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच तुफान धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. (Newcomer Rajveer Deol) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या राजवीर देओल आणि पलोमा यांनाही त्यांच्या साधेपणा, (DONO TRAILER) आकर्षकपणाबद्दल खूप कौतुक मिळत आहे. (DONO TRAILER LAUNCH) या जोडीला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळत आहे. तसेच आता आग लगदी गाणेही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


‘डोनो’चा टायटल ट्रॅक रोमँटिक आणि अत्यंत भावनिक असला तरी गाणेही नाचायला लावणार आहे. (MOVIE TRAILER) पुण्यातील एका कार्यक्रमात हे गाणे मोठ्या जल्लोषात प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. राजवीर आणि पलोमा ‘आग लगदी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना वर्षातील फेस्टिव्हल नंबर देणार गाणं असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, निर्मात्यांनी जाहीर केले की हा चित्रपट 5 ऑक्टोबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. एक भव्य डेस्टिनेशन वेडिंग ही पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमामध्ये वधूचा मित्र देव (राजवीर) वराची मैत्रिण मेघना (पालोमा) हिला भेटतो. एका भव्य भारतीय विवाहादरम्यान, दोन अनोळखी व्यक्तींमध्ये एक हृदयाला स्पर्श करणारा प्रवास सुरू होतो. रोमान्स, रिलेशनशिप आणि प्रेम सेलिब्रेट करणाऱ्या सिनेमामध्ये शहरी कथा दाखविण्यात आली आहे.

Dono Teaser Out: सनी देओलच्या दुसऱ्या लेकाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री! राजवीरच्या ‘दोनो’चा टीझर आउट

राजश्री प्रॉडक्शन १५ ऑगस्टला ७६ वर्षे पूर्ण करत आहे आणि हे दोन्ही राजश्रीचे सेलिब्रेशन सिनेमा आहेत. देशातील सर्वात जुने प्रॉडक्शन हाऊस आपला वारसा पुढे नेत आहे कारण राजश्रीची चौथी पिढी या पदाची सूत्रे हाती घेण्यास तयार आहे. राजश्री प्रॉडक्शन (पी) लि.ने कमल कुमार बडजात्या, स्वर्गीय राजकुमार बडजात्या आणि अजित कुमार बडजात्या निर्मित अवनीश एस बडजात्या दिग्दर्शित जिओ स्टुडिओजच्या सहकार्याने आपला ५९वा सिनेमा सादर केला आहे. या सिनेमासाठी क्रिएटिव्ह प्रोडक्शनचे प्रमुख सूरज आर. बडजात्या करत आहेत. हे दोन्ही सिनेमा ५ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube