Dono Teaser Out: सनी देओलच्या दुसऱ्या लेकाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री! राजवीरच्या ‘दोनो’चा टीझर आउट 

Dono Teaser Out: सनी देओलच्या दुसऱ्या लेकाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री! राजवीरच्या ‘दोनो’चा टीझर आउट 

Dono Teaser Out: बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा मोठा मुलगा करण देओलनंतर (Karan Deol) आता त्याचा धाकटा मुलगा राजवीर देओल (Rajveer Deol) याने देखील बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री मारल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतेच त्याच्या आगामी ‘दोनो’ (Dono Teaser Out) या सिनेमाची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. या सिनेमामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री पूनम ढिल्लनची (Poonam Dhillon)  मुलगी पलोमा ठाकेरिया देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


या टीझरमध्ये दोघांची जोडी अतिशय रंजक दिसत असल्याची चर्चा देखील सुरु आहे. दोघेही राजश्री प्रॉडक्शनमधून आपल्या करिअरची सुरुवात केले आहेत. त्यांचा हा सिनेमा रोमँटिक आणि ड्रामा असणार असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाचा टीझर देखील अतिशय सुंदर आणि रोमँटिक असल्याचे पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये मैत्रिणीच्या लग्नात दोन अनोळखी व्यक्ती भेटतात आणि मग त्यांची प्रेमकहाणी सुरूवात होत असल्याचे बघायला मिळाले आहे.

राजश्री कॅम्पने दरवेळेप्रमाणेच या सिनेमात देखील रोमान्सचा भरणा केल्याचे बघायला मिळणार आहे. राजवीर आणि पलोमा यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. परंतु ही ऑन-स्क्रीन जोडी खूपच प्रभावी दिसून येणार असल्याची चर्चा होत आहे. राजवीर देओलच्या डेब्यूच्या बातम्या कायम चर्चेत येत असतात. आता तो पलोमाबरोबर डेब्यू करणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘मैने प्यार किया’ या सिनेमाच्या ३३ वर्षांनंतर राजश्री एका नव्या प्रेमकथेसह पुनरागमन केल्याचे बघायला मिळणार आहे. यादरम्यान त्यांनी अनेक रोमँटिक सिनेमा केले आहेत.

करीना कपूर चाहत्यांशी कशी वागली? नारायण मूर्तींनी सांगितला किस्सा

परंतु ते वेगळ्या प्रकारचे होते. ‘मैने प्यार किया’ मधील प्रेम आणि सुमनची कथा लोकांना खूपच आवडली होती. त्यामुळे आता ‘दोनो’मधील देव आणि मेघना पुन्हा एकदा प्रेमाची नवीन कथा घेऊन थिएटरमध्ये झळकणार आहेत. या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी अद्याप कोणतेही घोषणा करण्यात आली नाही, तरी देखील लवकरच तो प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. सनी देओलने देखील रोमँटिक सिनेमाने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘बेताब’ हा सनी देओलचा पहिला सिनेमा होता. ‘बेताब’ हा एक रोमँटिक आणि ड्रामा सिनेमा होता. भाऊ करण देओलनंतर आता राजवीर देखील रोमँटिक सिनेमामधून एन्ट्री मारली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube