As many as 24 schools in Pune district are unauthorized : पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ही जिल्ह्यातील 24 अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. या शाळांना मान्यता नसल्यामुळे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले.
सर्व शाळा जून महिन्यापासून सुरू होत आहेत. काही शाळांना शासनाची मान्यता नसताना शाळा प्रवेशाची जाहिरात करतात, त्यानुसार प्रशासकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका पुणे, प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व), जि. पुणे यांचेकडील अहवालानुसार खालील शाळा अनधिकृत असल्याची माहिती मिळाली आहे.
या शाळांमध्ये पुणे ग्रामीण भागातील 24 शाळा अनधिकृत आहेत. त्यापैकी 13 शाळांना शासन मान्यता नाही, तसेच 11 शाळांना मान्यता मिळालेली आहे, परंतु त्या शाळा मुळ जागेवर भरत नाहीत. अन्य ठिकाणी अनधिकृत स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत. पुणे महानगरपालिका पुणे कार्यक्षेत्रातील 12 शाळा अनधिकृत असून इरादा पत्र मिळालेल्या 3 शाळा आहेत. त्या शाळांना अंतिम शासन मान्यता मिळालेली नाही.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पिंपरी कार्यक्षेत्रातील 9 शाळा अनधिकृत आहेत. त्यापैकी एका शाळेला इरादा पत्र प्राप्त असून त्यांना अंतिम शासन मान्यता मिळालेली नाही.
भोर
1) सेंट झेव्हिअर्स स्कूल
हवेली
1) ओरिजनल मातोश्री इंग्लिश मिडीअम स्कूल, सोरतापवाडी
इंदापूर –
1) न्यु लिफ इंग्लिश मेडीयम स्कुल, सरडेवाडी, इंदापूर
2) ईरा पब्लीक स्कुल, इंदापूर
3) अहिल्या इंग्लीश मेडीयम स्कूल, काझड
खेड
1) जयश्री इंग्लिश मिडीयम स्कूल, ठाकूरवस्ती (सोलू)
2) ज्ञानराज इंग्लिश मिडीयम स्कूल मरकळ
3) ग्यानज्योत इंग्लिश मिडीयम स्कूल, पद्मावती रोड, आळंदी
4) छत्रपती शिवाजी राजे विद्यालय आळंदी केळगाव रोड
5) हम्पी डम्पी प्री स्कूल देव कृपा मॉल वाडा रोड, ता. खेड, जि. पुणे
मावळ
1) सरस्वती विद्यालय आळंदी केळगाव रोड ता. खेड, जि. पुणे
2) जिजस क्राईस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल, कामशेत
3) सनशाईन इंग्लिश मेडियम स्कूल, नवलाख उंबरे
मुळशी
1) एंजल हाय दत्तवाडी नेरे
2) क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल जांबे
3) श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगांव, ता. मुळशी, जि. पुणे
4) चाणाक्य ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट, ता. मुळशी, जि.पुणे
5) सरस्वती क्लासेस पिरंगुट
6) रोझलँड इंटरनॅशनल स्कूल, पिरंगुट
7) एलिट इंटरनॅशनल स्कूल, कासारआंबोली, ता. मुळशी, जि. पुणे
8) पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल पिरंगुट
शिरूर
1) सेंट चावरा स्कूल सारडवाडी, शिरूर
