राज्यात AMIM गाडी जोरात; तब्बल 95 नगरसेवक विजयी, कुठे मारली बाजी?

एमआयएमचे तब्बल 95 उमेदवार निवडून आले असून, मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पक्षाने आपली ठोस उपस्थिती नोंदवली.

Untitled Design (263)

Untitled Design (263)

As many as 95 AMIM candidates won across the state : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने जोरदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यभरातील 11 प्रमुख महानगरपालिकांमध्ये AMIM तब्बल 95 उमेदवार निवडून आले असून, मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पक्षाने आपली ठोस उपस्थिती नोंदवली आहे. निवडणूक निकालांनुसार, मुंबई महानगरपालिकेत एमआयएमचे 3 उमेदवार निवडून आले आहेत, तर ठाणे महानगरपालिकेत पक्षाच्या 5 उमेदवारांनी विजय मिळवला आहे. एमआयएमचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 16 जागांवर एमआयएमचे उमेदवार निवडून आले असून, येथे पक्ष एक मोठी राजकीय ताकद म्हणून समोर आला आहे.

लातुरमध्ये काँग्रेसची मुसंडी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विलासराव देशमुखांबद्दलच वक्तव्य भाजपला भोवलं

या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी स्वतः मैदानात उतरून संपूर्ण राज्यात 19 झंझावाती सभा घेतल्या होत्या. या सभांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद थेट मतपेटीतून उमटल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे. विशेषतः मुस्लीम बहुल आणि दलित वस्त्यांमध्ये एमआयएमने महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर कडवे आव्हान उभे केले. दरम्यान, नांदेड महानगरपालिकेत एमआयएमचे 9 उमेदवार निवडून आले आहेत, तर धुळे महानगरपालिकेत 8 जागांवर पक्षाने विजय मिळवला आहे. याशिवाय अमरावती आणि नागपूर महानगरपालिकांमध्येही एमआयएमच्या उमेदवारांनी समाधानकारक यश मिळवले आहे.

एमआयएमच्या या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील पारंपरिक राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला असून, आगामी काळात स्थानिक राजकारणात एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version