Download App

VIDEO : देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत होती न्यायालयात सांगायचं… ‘बाबरी’च्या दाव्यावरुन ओवैसींचा हल्लाबोल

Asaduddin Owaisi: अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराचं (Ayodhya Ram Temple)लोकार्पण येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे, तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु आहेत. त्यातच आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी Asaduddin Owaisiयांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी बाबरी मशिदीवर केलेल्या वक्तव्यावरुन घणाघाती टीका केली आहे. बाबरी (Babri Masjid)पाडली त्यावेळी आपण त्याच ठिकाणी होतो, आणि तो आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होता असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे, त्यावरुन खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हल्लाबोल केला आहे.

शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 536 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांना 11 हजार कोटींचा फटका

यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी बाबरी मशिदीशी संबंधित दिवाणी आणि फौजदारी निकालावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. ओवैसी म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की, 6 डिसेंबरला जेव्हा बाबरी मशिद पाडली तेव्हा आपण तिथे होतो आणि तो आपल्यासाठी आनंदाचा दिवस होता असं त्यांनी सांगितलं. आपण घटनात्मक पदावर आहात. उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही राज्यघटनेची शपथ घेतली आहे. तुम्ही म्हणत आहात की, बाबरी पाडली हे चांगलं काम झालं. हे तुम्ही लोकांना भडकवण्याचं काम करत नाहीत का? असाही सवाल यावेळी ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री असून आपण अशा पद्धतीची भाषा वापरत आहेत. तुम्हाला आज एवढी हिंमत आली आहे तर तुम्ही हे न्यायालयात जाऊन सांगायला हवं होतं, की आम्हीच बाबरी मशिद पाडली. पण त्यावेळी तुम्ही घाबरुन गेले आणि सांगितलं नाही. त्यामुळे त्यात प्रकरणावरुन कोणाला शिक्षाही झाली नाही, असेही यावेळी ओवैसी म्हणाले.

‘तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर…’; अंगणवाडी सेविकांच्या मोर्चातून ठाकरेंचा हल्लाबोल

आत्ता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनही बाबरी पाडण्यामध्ये आपला हात असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे. त्यांनीही न्यायालयात जाऊन गुन्हा मान्य का केला नाही? आपण शिक्षेला का घाबरतात? असाही सवाल यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकारने बाबरीविषयीच्या निकालाविरोधात अपील केलं नाही असं म्हणत पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, गेल्या 200-300 वर्षांपासूनच्या दर्गा आपण हटवून टाकू, त्यावरुन ओवैसी म्हणाले की, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुमच्यासाठी सर्व धर्म सारखेच असले पाहिजेत. तुमच्यासाठी हिंदू, मुस्लिम, शिख, दलित सर्व सारखेच असायला हवेत. पण तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असूनही बकवास करत आहेत, असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी घणाघाती टीका केली.

follow us

वेब स्टोरीज