Asha Bhosle : सिनेविश्वातील जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज (12 एप्रिल) वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने 11 एप्रिलच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
आशा भोसले (Asha Bhosle) यांनी त्यांच्या कारकिर्दीत 12 हजाार पेक्षा जास्त गाणी गायली आहे. त्यामुळेच त्यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. आशा भोसले फक्त 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिल दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) यांचं निधन झाले. यानंतर त्यांची बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गाणे सुरु केले.
वयाच्या 10 व्या वर्षी आशा भोसले यांनी ‘माझा बाळ’ (1943) या मराठी चित्रपटासाठी ‘चला माझं बाळ चला नवबाला’ हे पहिले गाणे गायले. यानंतर त्यांनी हिंदीसह विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहे. 2011 आशा भोसले यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंदले गेले. 2008 आशा भोसले यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2000 आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात आले. 1997 आशा भोसले या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या पहिल्या भारतीय गायिका होत्या. तर 1949 मध्ये त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी पळून जाऊन गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले होते मात्र हे लग्न जास्त काळ टिकले नाही.
या लग्नादरम्यान त्यांना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले असल्याचा दावा त्यांनी आशा भोसले यांचे चरित्र ‘आशा भोसले: अ लाईफ इन म्युझिक’ या पुस्तकात केलं आहे. ‘आशा भोसले: अ लाईफ इन म्युझिक’ मध्ये त्यांनी लिहिले की, गणपतरावांनी आशावर अनेक वेळा हात उचलला होता. पुस्तकानुसार, गणपतरावांनी आशा गर्भवती तिच्यावर हात उचलला होता. त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले.
आशा भोसले सिद्धहस्त व प्रतिभासंपन्न गायिका: राज्यपाल जिष्णु देव वर्मा-
गणपतराव लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी होते. यामुळे लता मंगेशकर यांना खूप दुःख झाले आणि त्यांनी त्यांच्या धाकट्या बहिणीशी असलेले संबंध तोडले. जेव्हा आशा भोसले त्यांच्या पहिल्या मुलाची आई झाल्या तेव्हा मंगेशकर कुटुंबाने त्यांना स्वीकारले, परंतु गणपतरावांना हे आवडले नाही. यानंतर त्यांनी आर.डी.बर्मन यांच्याशी लग्न केले.
