ठाकरेंचा ‘मनीष सिसोदिया’ करू : आशिष शेलार यांनी धमकावले

मुंबई : दिल्लीचे (Delhi) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia)यांना अबकारी धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक (Arrest)करण्यात आलीय. या अटकेवरून राजकीय (Political)वर्तुळात एकच खळबळ उडाल्याची पाहायला मिळतेय. दिल्लीप्रमाणंच (Delhi)महाराष्ट्रातही (Maharashtra)दारुवाल्यांवर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi Sarkar)खैरात केली होती. त्यामुळं तत्कालीन ठाकरे सरकार (Thackeray Sarkar)संशयाच्या घेऱ्यात आहे. महाराष्ट्रात पण जी सवलतींची […]

Ashish Shelar Uddhav Thackeray

Ashish Shelar Uddhav Thackeray

मुंबई : दिल्लीचे (Delhi) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia)यांना अबकारी धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक (Arrest)करण्यात आलीय. या अटकेवरून राजकीय (Political)वर्तुळात एकच खळबळ उडाल्याची पाहायला मिळतेय. दिल्लीप्रमाणंच (Delhi)महाराष्ट्रातही (Maharashtra)दारुवाल्यांवर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi Sarkar)खैरात केली होती. त्यामुळं तत्कालीन ठाकरे सरकार (Thackeray Sarkar)संशयाच्या घेऱ्यात आहे. महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होण्याचे संकेत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी ट्विटद्वारे दिलेत.

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, ज्या पद्धतीनं दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे, तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारनं केली होती. विदेशी दारुवरील कर माफ करण्यात आला होता. बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत देण्यात आली होती. वाईन किराणा दुकानात विकण्यास परवानगी देण्यात आली होती.

Shivsena : प्रतोद नेमण्यासाठी एकनाथ शिंदेंचं उपसभापतींना पत्र

दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? म्हणूनच अरविंद केजरीवाल भेटीसाठी आले होते? दारुवाल्यांचे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात? अशा आशयाचे विविध प्रश्न या ट्वीटद्वारे आशिष शेलार यांनी केले आहेत.

Exit mobile version