“अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीच, मुक्त भ्रमणाचा अधिकार देखील…” अशोक चव्हाणांची टीका

“सुरतला जाणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे; आता मुक्त भ्रमणाचा अधिकार देखील काढून घेण्यात आला आहे की काय? ” अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सुरतला जाणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे; […]

_LetsUpp (2)

ashok chavan

“सुरतला जाणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे; आता मुक्त भ्रमणाचा अधिकार देखील काढून घेण्यात आला आहे की काय? ” अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

“आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” संभाजीनगरच्या सभेवर रावसाहेब दानवेंनी टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरात कोर्टात हजर झाले.  यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनसाठी राज्यातील काही काँग्रेस नेते गुजरातला जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांचा गाड्या अडवल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी (Yashomati Thakur) केला आहे. याच पार्शभूमीवर अशोक चव्हाण यांनी देखील यावरून टीका केली आहे.

मानहानीच्या प्रकरणात (Defamation case) दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नुकतेच लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. आपल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करून न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे. गांधींनी आपल्या याचिकेत ‘मोदी आडनाव’ प्रकरणात दोषी ठरवणारा दंडाधिकार्‍यांचा आदेश रद्द करण्याची मागणी करणार आहेत.

https://letsupp.com/politics/trupti-desai-bjp-cm-on-pankaja-munde-30848.html

दरम्यान आज वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुजरातच्या सुरत सत्र न्यायालयाकडून राहुल गांधी यांचा जामीन मंजूर झालाय. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 13 एप्रिलला आहे.

 

Exit mobile version