“आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” संभाजीनगरच्या सभेवर रावसाहेब दानवेंनी टीका

  • Written By: Published:
“आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” संभाजीनगरच्या सभेवर रावसाहेब दानवेंनी टीका

Raosaheb Danve On Mahavikas Aaghadi : संभाजीनगर मध्ये काल पार पडलेली महाविकास आघाडीचीच सभा म्हणजे “आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” अशी झाली, अशी टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. काल झालेल्या सभेच्या पार्शभूमीवर दानवे यांनी आज दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

यावेळी ते म्हणाले की महाविकास आघाडीची सभा म्हणजे आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” अशी आहे. तीन पक्ष मिळून त्यांनी अशी सभा घेतली. त्याला ते मोठा प्रतिसाद म्हणत असतील तर भारतीय जनता पार्टी एकटा एवढी गर्दी गोळा करू शकते. राजकारणात सर्व पक्षांना शक्ती प्रदर्शन करायचं असतं आज त्यांनी केलं आम्ही देखील करू, असं यावेळी दानवे म्हणाले.

 

Uddhav Thackeray ; आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान मोदींना का नसावा?

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोलताना विचार करायला पाहिजे, असा सल्ला रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. ते पुढे म्हणाले की आपल्या देशात सार्वजनिक व्यासपीठावर प्रश्न सुटले नाहीत तर ते कोर्टात जातात. पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीचा प्रश्न देखील असाच कोर्टात गेला होता. कोर्टाने यावर निकाल दिला आहे, तो सर्वानी मान्य केला पाहिजे.

आजकाल विरोधी पक्ष संविधान वाचवण्याची भाषा करतात पण त्यांना कोर्टाने दिलेले निर्णय मान्य नसतात, निवडणूक आयोगाने दिलेले निर्णय मान्य नसतात. यावर त्यांनी विचार केला पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

औकात काढणाऱ्या मंत्र्याला रोहित पवारांनी सुनावले, फक्त ‘वाट’ लावू नका!

भाजपला नामशेष करणारा पक्ष देशात नाही

कालच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपला नामशेष करू त्यावर उत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले, भाजपला नामशेष करणारा एकही पक्ष देशात सध्या नाही. किंवा देशातल्या एकाही व्यक्तीमध्ये ती ताकद नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अशा वलग्ना करणं सोडून द्यावं अशी टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी कालच्या सभेत काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले सभेत हजर नव्हते. त्यावर विचारले असता त्यांनी माझ्यापेक्षा तुम्हाला नाना पाटोले यांच्या पोटातलं दुखणं माहिती आहे. असं खोचक उत्तर दिल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube