औकात काढणाऱ्या मंत्र्याला रोहित पवारांनी सुनावले, फक्त ‘वाट’ लावू नका!

औकात काढणाऱ्या मंत्र्याला रोहित पवारांनी सुनावले, फक्त ‘वाट’ लावू नका!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) आणि सावरकरांच्या (SwatantraVeer Savarkar) मुद्द्यांवर आमने समाने आले आहेत. कालिचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावरुन रोहित पवार यांनी भाजपला गांधी विचार संपवायचा आहे त्यांनी अधिकृत भूमिका घ्या, असे आव्हान दिले होते.

त्यांच्या या टीकेला उत्तर देताना रवींद्र चव्हाण म्हणले की कोण रोहित पवार? त्याची औकात काय? अशी टीका केली होती. आता यावरुनचं रोहित पवारांनी तुमची मानसिकता कोणत्या विचारांची आहे, हे मी चांगलं ओळखून आहे, असे प्रत्युत्तर चव्हाणांना दिले आहे.

वादाला सुरुवात कशी झाली?
काही दिवसांपूर्वी कालिचरण महाराजांनी महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत, जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं, असं आव्हान भाजपला दिलं होतं.

रवींद्र चव्हाणांनी औकात काढली
याबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही सावरकर गौरव यात्रा आहे. कोण रोहित पवार? काय त्याची औकात आहे? त्याच्याबद्दल काय बोलायला पाहिजे? बोलण्याच्या औकातिचा तो माणूस नाही. ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही त्याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीका रोहित पवार यांच्यावर केली होती.

Maharashtra Politics : ‘एमआयएम बद्दल काहीही…’; उद्धव ठाकरेंना मनसेचा सवाल

रोहित पवार म्हणाले, तुमची मानसिकता माहितीय
रवींद्र चव्हाणांच्या त्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट केले की, रवींद्र चव्हाण साहेब आपण केवळ भाजपचे सदस्य नाहीत तर सुसंस्कृत महाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री आहात. त्यामुळं पत्रकारांना उत्तर देण्यापूर्वी किमान त्यांचा प्रश्न समजून घ्यायला हवा. पत्रकार गांधी विचारांबाबत प्रश्न विचारतायेत आणि आपण उत्तर सावरकरांबाबत देताय. पत्रकारांचा प्रश्नच कळंत नसेल तर सावरकर समजून घेणं हा खूप लांबचा विषय असू शकतो.

राहिला प्रश्न ओळखण्याचा. तुम्ही मला ओळखत नसलात तरी एससी बांधवांबाबत मागं तुम्ही केलेल्या वक्तव्यावरुन तुमची मानसिकता कोणत्या विचारांची आहे, हे मी चांगलं ओळखून आहे. असो! माझ्यावर टीका करण्यासाठी प्रश्न समजून न घेता उत्तर दिलं हे ठीक आहे. फक्त मंत्री म्हणून महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचे प्रश्न सोडवताना त्यांची ‘वाट’ लावू नका, एवढीच अपेक्षा!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube