Who is Ashok Kharat : मोठमोठाल्या मंत्र्यांचे भविष्य सांगणाऱ्या व स्वतःला ज्योतिष म्हणून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्याखाली नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. एका महिलेने खरात याच्यावरती अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. यावर पोलिसांनी या भामट्या ज्योतिषाला गजाड केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांना तपासादरम्यान स्वयंघोषित ज्योतिषाकडून तब्बल 58 व्हिडिओ देखील मिळाले असून यामध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी संबंधित असल्याचे देखील माहिती समोर आली आहे.
स्वयंघोषित कॅप्टन
अशोक खरात (Ashok Kharat) हा मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी आहे. तब्बल 22 वर्ष मर्चंट नेव्हीमध्ये त्याने काम केले आहे. नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर तो सध्या शिवनिका ट्रस्टचे नेतृत्व करतोय त्याने विश्वशास्त्राच्या क्षेत्राला आपली पुढील कारकीर्द म्हणून चालू ठेवल्याचे देखील सांगितले जाते. राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्याने त्याचे भविष्य तसेच नामांकित व्यक्तींचे भविष्य देखील तो सांगतो.
अत्याचाराच्या आरोपाखाली अटक
स्वयंघोषित कॅप्टन उर्फ खरात विरोधात एका 35 वर्ष महिलेने अत्याचाराची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. धमकी देऊन आणि गुंगीचे औषध देऊन आपल्यावर अत्याचार केल्याचं महिलेने सांगितलं. या गुन्ह्याखाली नाशिक पोलिसांनी खरातला अटक केली. पोलिसांकडून अटक झाल्यानंतर घरात याची अधिक चौकशी केली असता पोलिसांना धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.
सेलिब्रेटी आणि नामांकित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओचा पेन ड्राईव्ह
खरातला अटक केल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याच्याकडून एक पेन ड्राईव्ह जप्त केला ज्यामध्ये 58 अक्षरी व्हिडिओ असून त्याची सत्यता पोलिसांकडून पडताळण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये नामांकित महिला तसेच सेलिब्रिटी, वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांची माहिती देखील मिळत असल्याचं समोर येत आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली खरातचा काळा चेहरा हा पोलिसांनी उघड केलाय.
एकनाथ शिंदे यांचे भविष्य सांगितल्याने आला चर्चेत
स्वतःला स्वयंघोषित ज्योतिष म्हणून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरातला अत्याचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे मात्र राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा खरात याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भविष्य सांगितल्याने तो चर्चेत आला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये शिंदे यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशानेश्वर मंदिराला भेट दिली तेव्हा खरात ने मुख्यमंत्र्यांचा हात पहिल्यांदा व भविष्य वर्तवल्याने तो चर्चेत आला होता.
खरातचे धागेदोरे कोणापर्यंत पोलिसांकडून शोध सुरू
आपले भविष्य जाणून घेण्यासाठी राजकीय नेत्यांसह मोठमोठाले सेलिब्रिटी वरिष्ठ अधिकारी नामांकित व्यक्ती हे खरात कडे जात असत. हाय प्रोफाईल लोकांशी असलेल्या संपर्कामुळे या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यातच पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यांमध्ये सापडलेल्या पेन ड्राईव्ह व त्यामधील व्हिडिओंमुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील झाले असून खरात याचे नेमके कोणा कोणाशी संबंध होते? याचा उलगाडाही होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
