Download App

Assembly Election : 9. 63 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार; पुरुष अन् महिला किती?

विधानसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 9. 63 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आलीयं.

Assembly Election : राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी निवडणुकीसाठी (Assembly Election) मतदान होणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिलीयं. नुकतीच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली असून या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आलीयं. यावेळी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तसेच मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नागरिकांसाठी अनेक सुविधा देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आहेत. त्यापैकी 232 सर्वसाधारण मतदारसंघ तर 25 एसटी आणि 29 एससी राखीव मतदारसंघ असणार आहेत. तसेच राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यापैकी 4.97 कोटी पुरुष मतदार तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. तर 1.85 कोटी तरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर राज्यात एकूण 20.93 लाख नवीन मतदार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र असणार आहेत. त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 मतदान केंद्र असणार आहेत. तसेच 52 हजार 789 बुथ असणार आहेत. येत्या 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार होती, त्याआधीच निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीची घोषणा करण्यात आलीयं.

पेट्रो डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन; ..अन्‍यथा ३१ ऑक्‍टोबरला पेट्रोलपंप बंद करणार

जम्मू-काश्मीर अन् हरियाणाच्या मतदारांचे आभार
पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा न होता निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीच्या काळात एकही गोळी आणि काठी चालली नाही. जम्मूच्या जनेतेने अतिशय शांत पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली. शांततेत मतदान पार पाडल्याबद्दल जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या मतदारांचे निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आभार मानले आहेत.

नागरिकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहे. ज्या मतदारांचे वय 85 पेक्षा अधिक असेल अशा मतदारांना घरुन मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आलीयं. तर निवडणूकीचं संपूर्ण चित्रिकरण करण्यात येणार असून गुन्हेगारी पार्श्वभऊमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय.

follow us