Devendra Fadnavis : उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Legislature) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला परंपरेप्रमाणे सत्ताधारी पक्षाने विरोधकांना चहापानाचे निमंत्रण दिले जाते. मात्र विरोधकांनी चहापान समारंभावर बहिष्कार टाकला. शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था याविषयी सरकार गंभीर नाही त्यामुळं चहापानावर बहिष्कार घालत असल्याचं विरोधकांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.
Maratha Reservation : मराठा बांधवांनो मी येतोयं…; मनोज जरांगेंची पुढची रणनीती ठरली!
चहापानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना फडणीस म्हणाले की, आज विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकत पत्र दिलं. खोटं बोलं पण रेटून बोल हे त्यांचं धोरणं. खोटं बोलून निवडणुकीत मतं मिळाल्याने आता खोटचं बोलायचं या मानसिकतेत विरोधी पक्ष गेला. त्यांनी दिलेलं पत्र एका वाक्यात सांगायचं तर आरशात त्यांनी आपला चेहरा पाहिला पाहिजे, अशी टीका फडणवीसांनी केली.
Ajit Pawar : ‘मनुस्मृतीच समर्थन नाही’ अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
पुढं बोलतांना फडणवीस म्हणाले, विदर्भातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात सरकारला अपयश आलं, असं ते म्हणाले. पण, अडीच वर्ष ज्याचं सरकार त्यांनी विदर्भातील एकाही प्रकल्पाला गती दिली नाही. ते आम्हाला सांगत आहे की, विदर्भात प्रकल्प मार्गी लागले नाहीत. आमच्या सरकारने बळीराजासारखी योजना आणली आहे. तसेच, आम्ही 87 प्रकल्प पूर्ण करत आणले आहेत. वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाचा जीआर 2019 मध्ये काढला. आधीच्या सरकारमध्ये त्याची फाईल मुंगीच्या गतीनेही हलली नाही, असं फडणवीस म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील एकही श्लोक समाविष्ट करण्यात आला नाही. मनुस्मृतीला राज्य सरकारचं समर्थन नाहा. मनुस्मृतिसारख्या मुद्द्याला महाराष्ट्रात स्थान नाही हे विरोधकांना माहीत आहे, तरीही विरोधक जाणीवपूर्वक असे मुद्दे उपस्थित करून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे राजकारण करणे योग्य नाही, ते महाराष्टाला परवडणारं नाही, असं अजित पवार म्हणाले.