मुबई : सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मार्च – एप्रिल 2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आता काल परवा राज्यातील महाविकास आघाडीने 2024 जागा वाटपाचा फार्मुला ठरवला आहे. त्यामध्ये ठाकरे गट सर्वाधिक 21 लिकसभेच्या निवडणुका लढवणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार आहे. आता अशातच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडे 3 जागांची मागणी केली आहे.
रामदास आठवले म्हणतात महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या किमान 3 जागा देण्याचा विचार भाजप शिवसेना युती ने करावा. जर आम्ही त्यातील 2 जिंकून आलोतर आमच्या पक्षाला स्वतःचे निश्चित निवडणूक चिन्ह मिळेल. त्यामुळे यावर भाजप शिवसेना युती ने विचार करावा.
Corona: देशात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट XBB 1.16 ने चिंता वाढवली
तसेच मागच्या महिन्यात नागालॅंड मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने 2 आमदार निवडून आणले त्यामुळे नागालॅंडमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे. आता पुढील काळात म्हणजे 2024 ला महाराष्ट्रात होणाऱ्या विधासभेच्या निवडणुकीत 5 आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे आठवले म्हणाले. आता हे पाहणं महत्वाचं असेल की युती रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या निवडणुकी महाराष्ट्रात किती जागा देते.