Download App

आव्हाड समर्थकांनी सहाय्यक आयुक्ताला चोपलं, ‘त्या’ कथित क्लिपमध्ये धमकावल्याचा आरोप

ठाणे : सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने त्यांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांसह त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ही ऑडिओ क्लिप असल्याचं सांगण्यात येतंय.

आव्हाडांच्या मुलीला शूट करायचं आणि जावयाला उडवायच : कॅलिपमधील संभाषणाने खळबळ

महेश आहेर ठाणे महापालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त असून त्यांच्या या ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये महेश आहेर आणि अन्य दोघांमध्ये संभाषण झाले आहे. संभाषणात महेश आहेर यांनी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केल्याचं समोर आलंय.

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून मावळते राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांचं कौतुक, क्लिप व्हायरल

“माझं जेव्हा प्रोटेक्शन काढलं तेव्हा, रात्री पावणे बारा वाजता सीएमनी जॉइन्ट सीपीना फोन केला होता. माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका आहे, असं मी क्रिएट करून ठेवले आहे. पोलीस अधिकाऱ्यांना पटवून ठेवलं आहे. आव्हाड माझं केव्हाही काही करू शकतो, अस मी क्रीयेट करून ठेवलं आहे.

बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनमध्ये कामाला लावले आहेत. नातशाचा पत्ता शोधला आहे. त्याचा जावई ठाण्यात नाही आला. तर त्याच्या बापावर एक अटॅक केला ना, तर तो एका दिवसात येईल. मी एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावली. तो असा नाही आला ना त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे.

विरोधकांना आरोप करण्यासाठी.., Radhakrishna Vikhe Patil यांचा टोला

स्पेन एवढं मोठं नाही. त्याचा विकास कॉम्प्लेक्स पत्ता आहे. त्याच्या आई वडिलांच्या सोबत एक कांड केला. तर तो आई-बाबांच्या ओढीने लगेच येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली. त्याची गेम करणार त्याच्या मुलीला रडायला लावणार, म्हणजे त्याला कळणार मुलीच दुःख काय असत? प्लानिंग केलं आहे. तो साप आहे, मी सर्व प्लॅन केला आहे. त्याला देखील कळले पाहिजे महेश कधीही स्पॉट होऊ शकतो”, असे महेश आहेर याने संभाषणात म्हटलं आहे.

दरम्यान, अद्याप या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नसून पोलिसही या प्रकरणात काही करणार नसल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

Tags

follow us