आव्हाडांच्या मुलीला शूट करायचं आणि जावयाला उडवायच : कॅलिपमधील संभाषणाने खळबळ
ठाणे : मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस, हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर असून हा जे जे हत्याकांडातला एक आरोपी असल्याचं स्पष्टीकरणं आपल्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय.
जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची माहिती समोर आलीय. धमकीमध्ये आव्हाड यांची मुलगी आणि जावई यांना गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून धमकी प्रकरणात बाबाजीचे नाव पुढे आलंय.
Gopichand Padalkar : ‘यावर मंत्रीच गौडबंगाल करत आहेत’, पडळकरांचा सरकारला घरचा आहेर
या प्रकरणी जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला सकाळी माझ्या एका मित्राने ही ऑडिओ क्लिप आणून दिली. त्यामध्ये काही धक्कादायक बाबी आहेत. माझ्या मुलीपर्यंत किंवा जावयापर्यंत? पण माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात पैदा व्हायचा आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे 40 लाख दिवसाला जमा करतो, 20 लाख वाटतो, आणि सारखं त्याने बाबाजी आणि शूटर्सचं नाव घेतलं असल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलंय.
पुण्यात राष्ट्रवादी-मनसेत ट्वीटर वॉर; सुपारी, घोडा, येड्या भो… शब्द आणले !
विशेष म्हणजे स्पेनमध्ये मारेकरी तयार ठेवल्याचे रिकॉर्डींगमध्ये उल्लेख असून माझ्या अंदाजाने जी माहिती मुंबईची आहे, मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस आहे. हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर आहे. जो जे जे हत्याकांडातला एक आरोपी होता, असंही आव्हाडांनी सांगितलंय.
Gopichand Padalkar : ‘शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण नोटा आहेत’
दरम्यान, ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असलेल्या बाबाजीच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असून तो कुप्रसिद्ध आहे.
त्याच्या जीवावर हे सगळं शूटर्सचं प्लॅनिंग करतोय, हे तो बोलून दाखवतोय. नंतर म्हणतोय मी बाबाजींचं काम करणार आहे. हे सगळं जे काही चालू आहे त्याला लगाम घातला गेला नाही तर गैरकृत्यातून जमवलेली पैशांची थैली त्याने डोकं जड व्हायला लागतं. स्पेनमध्ये शूटर तयार ठेवलेत हे काय बोलणं झालं काय? असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय.