पुण्यात राष्ट्रवादी-मनसेत ट्वीटर वॉर; सुपारी, घोडा, येड्या भो… शब्द आणले !
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakeray) यांच्यावर ‘साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा-एक निराश मंदसैनिक’, असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष (NCP Pune President) प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सडकून टीका केली. त्यावर मनसेचे पुणे शहराध्यक्ष (MNS Pune President) साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनीही प्रतिहल्ला करत ‘लग्न लोकाचं आणि नाचतंय येड्या भो..चं’ असं उत्तर दिले. बुधवारी पुणे शहरातील दोन पक्षांच्या शहराध्यक्षामध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळाले.
साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार ? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा. – एक निराश मंदसैनिक
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 15, 2023
कसबा पेठेत हेमंत रासने आणि चिंचवडमध्ये अश्विनी जगताप या दोन्ही पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मनसेने पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत सडकून टीका केली. त्यावर अपेक्षेप्रमाणे पुणे मनसेकडून तीव्र उत्तर देण्यात आले.
लग्न लोकाचं @JagtapSpeaks नाचतंय येड्या भो..च#कसबाविधानसभापोटनिवडणूक
— साईनाथ बाबर Sainath Babar (@Sainathbabar7) February 15, 2023
पुण्यातील या दोन्ही पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मनसे पाठिंबा देणार, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. मंगळवारी (दि. १४) रोजी अखेर मनसेने भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. त्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी सडकून टीका केल्याने आता पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संघर्ष पेटण्याची चिन्ह आहे.