Download App

Karnataka Election : निवडणुकांपूर्वीच भाजपला धक्का; दिग्गज नेत्याची रणधूमाळीतून माघार!

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विधानसभाबाबत मोठी घोषणा केली आहे. बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या वयाचा दाखला देत मी कर्नाटकची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. एकूण पाच कोटी २१ लाख ७३ हजार ५७९ मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष दोन कोटी ६२ लाख तर महिला दोन कोटी ५९ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष बाब म्हणजे १८ ते १९ या वयोगटातील तब्बल ९ लाख १७ हजार मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

छ. संभाजीनगर दंगलीनंतर फडणवीसांचे खैरे अन् दानवेंकडे बोट, म्हणाले, नेत्यांनी… – Letsupp

आता कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षाबरोबर इतर पक्षांनी देखील मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मात्र वयाचा हवाला देत निवडणुकीतून माघार घेतली आहे.

काँगेस पक्ष भ्रष्ट आहे म्हणूनच आमच्यावर ४० टक्के कमिशनचा खोटा आरोप करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप कर्नाटकमध्ये बहुमताने पुन्हा सत्तेत येईल, असा दावा देखील बी. एस. येडियुरप्पा यांनी यावेळी केला आहे.

बी. एस. येडियुरप्पा म्हणाले की, माझे वय आता ८० च्या पुढे गेले आहे. त्यामुळे मी यापुढे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पक्षाच्या वतीने मी कर्नाटकात राज्यभर निवडणूक प्रचार करणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी प्रचार करणार आहे. तसेच २२४ विधानसभा जागांवर भाजपला बहुमत मिळून पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

(244) Ajit Pawar | गद्दारांवर भडकले अजित पवार, म्हणाले… | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us