Download App

खासगी बस वाहतूक दरात मोठी वाढ, प्रवासी वाहतूक संघटना आक्रमक

Baba Shinde On Private Buses : राज्यातील (Maharashtra) खासगी बसकडून वाहतूक दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याकडे प्रवासी वाहतूक संघटनेनं (Aggressive passenger transport organization)लक्ष वेधलं आहे. राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे (Baba Shinde)यांनी राज्यातील सर्व खासगी बस चालकांना व वाहतुकदारांना बस वाहतूक भाड्यात वाढ न करण्याची विनंती केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर (Social media)एक पोस्ट लिहून सर्व बस चालकांना आरटीओ नियमाप्रमाणेच (RTO Rules) वाहतूक भाडे आकारण्याचे आवाहन केले आहे.

‘कळ लावे’ म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर बोचरी टीका

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, राज्यातील सर्व खासगी बस चालकांना नम्रपणे आवाहन आमि विनंती, प्रिय वाहतूकदारांनो आपण राज्य व राज्याच्या शेजारील भागातील सर्व ठिकाणी प्रवासी बसेसद्वारे प्रवाश्यांना नेण्या-आणण्याचं काम करीत आहेत. आता शाळांना मे महिन्याची सुट्टी लागलेली आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सोशल मीडियावर व इतर मीडियामध्ये खासगी बस चालकांनी मोठ्या प्रमाणात दर वाढवले अशा प्रकारे नाराजीचा सूर जाणवत आहे. दिवाळीचे पंधरा दिवस व मे महिना यामध्ये सर्वसामान्य नागरिक हे ये-जा करीत असतात. हेच प्रवासी आपल्याला वर्षभर व्यवसाय देत असतात, तरी सर्वांनी आरटीओ नियमाप्रमाणे मंजूर असलेल्या दराप्रमाणेच व्यवसाय करून जनतेची व प्रवाशांची सेवा करावी अशी विनंती, राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली आहे.

उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर खासगी बसकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्यांसाठी विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीचे फटका सहन करावा लागत आहे. खासगी बस वाहतूकदारांनी त्यांच्या दरात तब्बल 20 ते 25 टक्के भाडेवाढ केल्याची माहिती मिळाली आहे.

खासगी बसला एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेमध्ये जास्तीत-जास्त दीडपड भाडे घेणे बंधनकारक केले आहे. यापेक्षा अधिक भाडे घेतल्यास परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags

follow us